Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रचंड गर्मीत रेल्वेतील एसी बिघडल्याने प्रवासी संतप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांचा दोन तास प्रचंड गोंधळ स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी उभे केले हात आमचा विदर्भ - दुश्यंत आत्राम प्रतिनिधी बल्...
बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांचा दोन तास प्रचंड गोंधळ
स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी उभे केले हात
आमचा विदर्भ - दुश्यंत आत्राम प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. १७ मे २०२३) -
        मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाल्याने प्रचंड गर्मी व उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. याचा फटका सुपरफास्ट रेल्वेने वातानुकुलीत डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही बसला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास डब्ब्यातील एसीमध्ये बिघाड आल्याने प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर खाली उतरून ए.सी दुरूस्तीच्या चांगलाच गोंधळ मागणीसाठी घातला. स्टेशनवर तब्बल दीड ते दोन तास रेल्वे उभी होती. नंतर ही एक्सप्रेस पुढील प्रवासासांठी रवाना झाली.

        उन्हाळ्यात प्रवासी वातानुकूलित वर्गात तिकीट वेळेवर मिळविण्यासाठी चार महिने अगोदर तिकीट आरक्षण करतात. पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असताना रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांचा एसी बंद पडल्याच्या घटना एकाच आठवडयात बल्लारशहा रेल्वे स्टेशनवर दुसऱ्यांदा घडली. सोमवारी रात्री जयपूरहून चेन्नईला जाणारी ट्रेन क्रमांक 12968 जयपूर एक्स्प्रेस बल्हारशाह रेल्वे स्थानकावर आली असता येथे प्रवाशांनी ट्रेनच्या थर्ड एसी कोचचा एसी बिघाड झाल्याची तक्रार करत गोंधळ घातला.

        बल्हारशाह रेल्वे स्थानकावर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही प्रवाशांना ठोस उत्तर देऊ शकले नाही. उलट विजयवाडा स्थानकावर एसी दुरूस्त होईल असे आश्वासन देऊन त्यांनी हात वर केले. यावर समाधान न झाल्याने प्रवाशी आक्रमक होत स्थानकावर उतरून आम्ही पुढील प्रवास करणार नाही, आधी एसी दुरूस्त करा, अशी मागणी लावून धरली. वरिष्ठ अधिकाऱ्यांन बल्लारशहा स्थानकावर ए. सी दुरुस्तीची सेवा उपलब्ध नसल्याच कबुली दिली. गोंधळामुळे गार्ड बल्हारशाह रेल्वे स्थानकातून सुमा दोन तासांनी विलंब सुटली.

रेल्वे प्रशासनावर नागरिकांची नाराजी
        एका नाराज रेल्वे प्रवाशाने सांगितले की, ते या ट्रेनच्या वातानुकूलित डब्यातून कुटुंबातील चार सदस्य चेन्नईला जात आहे. ते नेहमी स्लीपर कोचमधून प्रवास करताना कडक उन्हाळा आणि लहान मुले पाहून त्यांनी थर्ड एसीचे तिकीट काढले पण एसीचे महागडे तिकीट घेऊनही स्लीपर कोचप्रमाणेच प्रवास करत आहेत. प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाची ही जाहीर लूट आहे, असा आरोप लावला.  (Balharshah Railway Station)

हमसफर एक्स्प्रेसमध्येही असाच प्रकार
        रविवारी रात्री बल्हारशाह रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी अजमेरहून रामेश्वरमकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 20973 हमसफर एक्स्प्रेसच्या एसी बिघाडाची तक्रार बल्हारशाह रेल्वे स्थानक व्यवस्थापनाकडे केली. परंतु बल्हारशाह रेल्वे स्थानक व्यवस्थापन त्यांना कोणतेही ठोस उत्तर देऊ शकले नाही, त्यामुळे प्रवाशांनी चांगलाच गोंधळ घातला. या गदारोळामुळे बल्हारशाह रेल्वे स्थानकातून गाडी 45 मिनिटे उशिराने सुटली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top