टीम आमचा विदर्भ
राजुरा (दि. २० मे २०२३) -
स्थानिक श्री संकटमोचक हनुमान मंदिरात सूर्यपुत्र श्री शनिदेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्य अहेरी येथील पंडित पांडे महाराज यांच्या सानिध्यात शनि देवाचे विधिवत अभिषेक, होमहवन करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी अनेक भक्तजन, व्यापारी, नागरिक व महिला उपस्थित होत्या. अभिषेक, होमहवन आणि महाआरती नंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. (rajura)
शनिदेव जन्मोत्सव चे महत्त्व आणि विधि - वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि जयंतीला (Shani Jayanti) विशेष महत्त्व आहे, असं म्हणतात या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्म झाला होता. या दिवशी शनि प्रकोप कमी करण्यासाठी खास उपाय केल्यास फायदा होतो, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात. पंचांगानुसार शनिदेवाची जयंती ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला साजरी करण्यात येते. धार्मिक ग्रथांनुसार या दिवशी सूर्य आणि सावलीच्या संयोगामुळे शनिदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे. या दिवशी शनि मंदिरात जाऊन मूर्तीवर तेल, फुलं आणि प्रसाद अर्पण करायची परंपरा आहे. त्याशिवाय उडदाची डाळ आणि काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनि महाराजाला काळा रंग प्रिय आहे. मान्यता आहे कि शनिवारी काळे वस्त्र घातल्याने शनि महाराजांची कृपेचा वर्षाव होतो.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.