Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिवती तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुनागुडा आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात अनेक दिवसापासून आरोग्य सेविकाच नाही  आमचा विदर्भ - क्रांतिराज कांबळे तालुका प्रतिनिधी जिवती (दि. २० मे २०२...
पुनागुडा आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात अनेक दिवसापासून आरोग्य सेविकाच नाही 
आमचा विदर्भ - क्रांतिराज कांबळे तालुका प्रतिनिधी
जिवती (दि. २० मे २०२३) -
        चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम तहसील म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब, दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम आणि उपयुक्त आरोग्य सेवा तालुका निर्मितीच्या २५ वर्षांनंतरही उपलब्ध झालेली नाही. कुपोषण, बालमृत्यू अशी अनेकविध आरोग्यसेवेची आव्हाने समोर असली तरी यांमध्ये आरोग्यसेवेवर भर देण्यात येथील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे  आहे. (Punaguda Arogyavardhini sub-centre has not had a health worker for many days) (Jiwati) (chandrapur)

        सरकारच्या (National Health Mission) राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत नवीन धोरणांनुसार (Arogyavardhini Center) आरोग्यवर्धिनी केंद्र विविध आरोग्य सेवांसाठी सुरु करण्यात आले. ग्रामीण जनतेला विविध आरोग्य सेवांसाठी पायपीट करावी लागणार नाही वा खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही हे या मागचे धोरण होते. मात्र या धोरणाला आता कुठेतरी खीळ बसत असल्याचे दिसून येत असून दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. 

        जिवती तालुक्यातील पुनागुडा आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मागील अनेक दिवसापासून आरोग्य सेविकाच नसल्याने सदर उपकेंद्र शोभेची वस्तू बनलेले आहे. या उपकेंद्रात कलघोडी, गणेरी, भाईपठार हि चार गावे येत असून या उपकेंद्रात मागील अनेक महिन्यांपासून आरोग्य सेविका नसल्याने रुग्णांना गावात आरोग्य उपकेंद्र असूनसुद्धा १८ किमी प्रवास करत पाटण ला जावे लागत आहे. तिथे सुद्धा आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असून तिथे अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना फोनवरच सॅले देऊन मोकळे होतात रुग्णांच्या नातेवाईकांनी जास्तच ओरडा ओरड केलीच तर त्या रुग्णाला रेफर टू चंद्रपूर व्हाया गडचांदूर अशी हेळसांड करतात. सदर प्रकार अनेक वर्षांपासून असाच सुरु असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी सरकारकडे साकडे घालणे आवश्यक असताना हे मुद्दे फक्त निवडणुकीपुरते तोंड बाहेर काढताना दिसून येतात. प्रशासनाने जिवती तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे, जिवती तालुक्यातील सर्वच आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तात्काळ आरोग्य सेवक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top