Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजूरा गडचांदूर मार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले वंचित चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. 21 मे 2023) -         राजूरा गडच...
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले वंचित चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. 21 मे 2023) -
        राजूरा गडचांदूर मार्गावरील हरदोना गावाजवळ MH-34 V-4850 या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली यात दुचाकीस्वार खाली पडला होता वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे गडचांदूर ला जात असतांना अपघातग्रस्त इसम रोडच्या कडेला बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत आढळला दरम्यान फुसे यांनी सदर इसमाची पाहणी करून तात्काळ आपत्कालीन 112 क्रमांकावर संपर्क साधला. (Vanchit district president Bhushan Phuse rushed to help the accident victim) (Vanchit Bahujan Aaghadi) (Chandrapur) (gadchandur)

        काही वेळातच गडचांदूर रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली अनैशा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुरज उपरे, सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे, वंचित बहूजन आघाडीचे राजेंद्र नळे, रवींद्र करमणकर व सुरज करमणकर यांच्या मदतीने अपघातग्रस्त इसमाला गडचांदूर उपजिल्हा रुग्णालयात (Gadchandur Upazila Hospital) पुढील उपचाराकरिता दाखल करण्यासाठी हलविण्यात आले. भूषण फुसे (Bhushan Phuse) यांनीही कार्यकर्त्यांसोबत पाठोपाठ रुग्णालय गाठून अपघातग्रस्ताची प्रकुर्तीची विचारपूस करून सुखरूप असल्याची माहिती जाणून घेतली. भूषण फुसे न अन्य कार्यकर्त्यांच्या वेळीच अपघातग्रस्ताच्या मदतीला धावल्याने एका निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचले याचे समाधान गडचांदूर परिसरातील वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यासह नागरिकांनी मानले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top