Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: साहेब,तुम्हीच सांगा आम्ही शेती कशी करायची!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मारडा शेतशिवारात वीज खांब वाकल्याने तारा आल्या जमिनीलगत  वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शेतीचा हंगाम करतांना म...
मारडा शेतशिवारात वीज खांब वाकल्याने तारा आल्या जमिनीलगत 
वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शेतीचा हंगाम करतांना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता
आमचा विदर्भ -अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. २१ मे २०२३) -
        तालुक्यातील मारडा येथील शेतकरी लहुजी रामू भोयर यांचे शेतात वीज खांब वाकल्याने वीज तारा पूर्णतः जमिनीलगत आल्या आहेत. शेतात हंगाम करतांना कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अनेकदा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सूचना देऊन वीज खांब व वीज तारा सुरळीत करून देण्याची विनंती केली.मात्र राजुरा येथील वीज वितरण कार्यालयात वारंवार चकरा मारूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे वीज खांबासोबत संपूर्ण लाईनच भुईसपाट होण्याची शक्यता असून शेतीचा हंगाम करतांना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे साहेब, तुम्हीच सांगा आम्ही हंगाम कसा करायचा अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Mismanagement of electricity distribution company; Neglect of senior officers)

        राजुरा तालुक्यातील मारडा (लहान) येथील शेतकरी लहुजी भोयर यांचे शेत अगदी गावालगत आहे. शेतातून मोटार पंपाला वीज पुरवठा करणारी वीज लाईन गेली आहे.परंतु मागील दोन वर्षापासून या लाईनचे वीज खांब वाकल्याने वीज तारा जमिनी लगत आल्या आहेत. शेतीचा हंगाम करतांना वीज तारा हाताला लागत असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी या वीज खांबावरील वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.  वीज खांब वाकल्याने वीज तार हाताला लागत असल्याने या ताराखालून शेतीची मशागत करतांना ट्रॅक्टर किंवा बैलही जाऊ शकत नाही. त्यामुळे याठिकाणी जीवघेणी स्थिती असल्याने शेतीचा हंगाम करतांना मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.याबाबत मारडा येथील शेतकरी लहुजी भोयर यांनी राजुरा येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन वीज खांब आणि तार सरळ करून देण्याची विनंती केली.मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटून गेला तरी वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अद्यापही याकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे हे वीज खांब केव्हाही वादळात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे.शेतकरी लगबगीने शेतीचा हंगाम पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहे.उन्हाळा चांगलाच तापत आहे.मे महिन्याचे काहीच दिवस शिल्लक आहे.त्यामुळे शेतकरी मशागत करण्यात व्यस्त आहे.पावसाळा अगदी तोंडावर आला आहे.अशा वेळेस वीज महावितरण कंपनीने टाकलेली वीज लाईन वादळात भुईसपाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाकलेले वीज खांब सुरळीत करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अन्यथा या वीज तारावरच आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे. (There is a possibility of a major accident during the farming season)
        माझ्या शेतात मागील एक वर्षापासून वीज खांब वाकल्याने जिवंत वीज तार अगदी जवळ आले आहे.शेतात हंगाम करतांना वीज तारांखालून ट्रॅक्टर किंवा बैलही जाऊ शकत नाही. त्यामुळे वीज तारांना स्पर्श होण्याची दाट शक्यता असल्याने कोणत्याही क्षणी याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.त्यामुळे वीज वितरण कंपनीचे तातडीने वाकलेले वीज तार व खांब सरळ करावे.अन्यथा याच वीज तारांवर आत्मदहन करेल.
लहुजी भोयर, शेतकरी मारडा
दुर्घटना झाल्यास महावितरणचे अधिकारीच जबाबदार......
        मारडा येथील शेतकरी लहुजी भोयर यांनी राजुरा येथील वीज वितरण कंपनीला याबाबत वारंवार सूचना देऊन याकडे महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केल्याने वाकलेले वीज खांब व वीज तारांमुळे हंगाम करतांना आता शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top