Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: टिप्परच्या धडकेत आई व मुलाचा जागीच मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वडील व मोठा मुलगा जखमी आमचा विदर्भ -ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर (दि. २१ मे २०२३) -         बुलेट आणि चारचाकीला टिप्परने दिलेल्या धडकेत मायलेका...
वडील व मोठा मुलगा जखमी
आमचा विदर्भ -ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. २१ मे २०२३) -
        बुलेट आणि चारचाकीला टिप्परने दिलेल्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर व मोठा मुलगा किरकोळ जखमी झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री 12.30 च्या सुमारास नागभीड ते तळोधी (बा.) मार्गावरील पलसगाव (खुर्द) पुलावर घडली. आई कल्पना रमाकांत कड्यालवार व मुलगा साहिल उर्फ बंटी रमाकांत कड्यालवार (वय 30) असे मृतकाचे नाव असून ते मूळचे नवरगावचे असून सध्या सिंदेवाही येथे राहत होते. (Accident) (Father and elder son injured)

        शनिवारी सिंदेवाही (Sindewahi) येथील कड्यालवार कुटुंबातील वडील पांडुरंग, आई कल्पना, मोठा मुलगा समीर व लहान मुलगा साहिल असे चौघेजण नागपुला बुलेट गाडी विकत घेण्यासाठी गेले होते. नागपुरात गाडी विकत घेतल्यानंतर ते भिवापूर मार्गे सिंदेवाहीला परत येण्यासाठी निघाले होते.
नागपूरवरून परत येत असताना साहील हा आपल्या कुटुंबियासमवेत भिवापूर येथे आपल्या सासुरवाडीला थांबला. त्या ठिकाणी जेवण करून सर्व कुटुंबीय अकराच्या सुमारास पुन्हा सिंदेवाही कडे निघाले. चारचाकी वाहनात वडील पांडुरंग व मोठा मुलगा समीर बसले. तर बुलेटवरून साहिल व आई कल्पना हे दोघे निघाले. दरम्यान, नागभीड ते तळोधी (बा.) मार्गावरील पलसगाव (खुर्द) पुलावर बुलेट रात्री साडेबाराच्या सुमारास बंद पडली. त्यामुळे आई व मुलगा पुलावर थांबले होते.

        पाठोपाठ समीर व वडील चारचाकीतून आले. बंद पडलेल्या दुचाकीला पाहत असताना विरूध्द दिशेने तळोधी (बा.) कडून भरधाव आलेल्या टिप्परने दुचाकीसह साहिल व आई कल्पना यांना जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की पुलाचा कतडा तुटून आई व मुलगा पुलाखाली पडले. यामध्ये साहिल व आई कल्पना जागीच ठार झाले. त्यानंतर टीप्परची धडक चारचाकी वाहनाला बसली. त्यामधील वडील पांडुरंग गंभीर तर मोठा मुलगा समीर किरकोळ जखमी झाला.

        अपघातानंतर चालक टीप्पर घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी वडील पांडुरंग यांना ब्रम्हपुरीला रूग्णालयात दाखल केले आहे. कड्यालवार कुटुंबिय मूळचे नवरगाव येथील होते. परंतू काही वर्षापासून सिंदेवाही येथे ते स्थायिक झाले आहेत. मृत मुलगा साहिल याचा विवाह भिवापूर येथील मुलीशी ठरलेला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा साक्षगंधही आटोपला होता. येत्या दिवसात विवाह होणार होता. लग्नाची तयारी सुरू झाली होती. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू व दोघे जखमी झाल्याने कड्यालवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top