Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वडगावात काँग्रेसचा एकतर्फी विजय तर कढोली खु. येथे अविरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामपंचायत पोटनिवडणूक आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २१ मे २०२३) -         ग्रामपंचायत कढोली खु. व ग्रामपंचायत...
ग्रामपंचायत पोटनिवडणूक
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २१ मे २०२३) -
        ग्रामपंचायत कढोली खु. व ग्रामपंचायत वडगावची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. वडगावात काँग्रेसच्या संचिता बबन मडावी यांनी शेतकरी संघटना, भाजपा व गोंडवाना युतीच्या कल्पना पद्माकर मडावी यांचा ६७ मताधिक्याने पराभव केला. निवडणुकीत कढोली खु. येथे शेतकरी संघटनेच्या लीलाबाई पांडुरंग कोटनाके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या रंजना उमाजी आत्राम अविरोध निवडून आल्या. (By-elections) (korpana)

      वडगाव येथे (Congress) काँग्रेसच्या बयनाबाई भिमराव चायकाटी या दोन वार्डातून निवडून आल्याने त्यांनी एका वार्डातील सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. तर कढोली खु. येथे शेतकरी संघटनेच्या उमेदवार लिलाबाई पांडुरंग कोटनाके अपात्र झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top