Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदुर (दि. २१ मे २०२३) -         मे महिना सुरू असून तापमानात प्रचंड वाढ झालेली असताना गडच...
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदुर (दि. २१ मे २०२३) -
        मे महिना सुरू असून तापमानात प्रचंड वाढ झालेली असताना गडचांदूर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वीज पुरवठा यंत्रणेत असलेले दोष निवारण करून सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. दिवस रात्र विजेचा पुरवठा कधीही खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तापमानात वाढ होत असतानाच वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक होळपळून निघत आहेत. (gadchandur)

        वीज वितरण कंपनी ने या गंभीर समस्या कडे तातडीने लक्ष वेधून  वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी नगर परिषद चे गटनेते क्रम येरणे यांनी केली आहे. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top