Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोनापूर येथील युवा सार्वजनिक गणेश मंडळातर्फे आरोग्य शिबीर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा सावली-व्याहाड बूज (दि. 27 सप्टेंबर 2023) -         सोनापूर येथे युवा सावर्जनिक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
सावली-व्याहाड बूज (दि. 27 सप्टेंबर 2023) -
        सोनापूर येथे युवा सावर्जनिक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक 2 6सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत या वेळेमध्ये करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील 125 लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. तर या आरोग्य सेवेमध्ये सर्दी, ताप, खोकला, बी.पी, शुगर, या सह इतरही आजाराबद्दल सेवा देण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरात पल्लवी हजारे समुदाय  आरोग्य अधिकारी प्रा.आ.केंद्र व्याहाड बूज यांनी आपली मोफत सेवा दिली. तसेच भोंडे आरोग्य सेवक,  वैजयंतीमाला शंभरकर आरोग्य सेविका, स्नेहा गोवर्धन आरोग्य सेविका, नंदा मेश्राम आशा वर्कर, ज्योती सू. गोवर्धन आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.

        या शिबिराचे आयोजन युवा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष दिनकर वाघाळे, उपाध्यक्ष्य मनोज कोसरे, सचिव पंकज रणदिवे, श्रीधर सोनुले शा.व्य.स.अध्यक्ष, यशवंत रणदिवे पोलिस पाटील, नंदकिशोर बांबोळे माजी अध्यक्ष त.मू.गा.स. कार्यकर्ते टीकाराम सातारे, आकाश कोसरे, दिनकर मेश्राम, प्रफुल राऊत, शुभम भंडारे, कैलाश वाघाळे, रोशन गुरणुले, राकेश मेश्राम, नीलेंद्र कोसरे, प्रमोद सातारे, दिवाकर राऊत, आकाश वाघाळे, सचिन बावणे, ऋषी सातारे, अमोल कोसरे, राहुल रणादिवे,सुभाष वाघाळे, राहुल भंडारे व गावातील इत्तर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे आरोग्य शिबीर उत्साहामध्ये संपन्न झाले. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top