Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत जिप भोयगाव शाळा अव्वल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुलींचा संघ जिल्हास्तरावर आमचा विदर्भ - धनराजसिंग शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. 27 सप्टेंबर 2023) -          मागील वर्षीप्रमाणे याव...

मुलींचा संघ जिल्हास्तरावर
आमचा विदर्भ - धनराजसिंग शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 27 सप्टेंबर 2023) - 
        मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 14 वर्षाखालील गटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव येथील मुलींनी कबड्डी स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवीत यश प्राप्त केले. मागील वर्षी जिल्हास्तरावर सेमिफायनल पर्यंत या मुलींना बाजी मारता आली होती व जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. या वर्षी जिल्हास्तरावर यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी अधिक मेहनत घेत आहेत. तसेच यावर्षी अंशिका विठ्ठल ठाकरे या विद्यार्थिनीने 400 मीटर धावणे स्पर्धेत यश मिळवत जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चित केलेले आहे. (Girls team at district level)

        मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या यशाच्या मागे सिहाचा वाटा अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही यांचा असून क्रीडाक्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थी यांचे करियर घडविण्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचे दिसून येते. पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता व विद्यार्थी यांच्या कामगिरी व यशाबद्दल पंचायत समिती कोरपना चे गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पिंपळशेंडे, अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही येथील प्रकल्प समन्वयक सरोज अंबागडे भोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जांभुलकर, तालुका क्रीडा अधिकारी प्रमोद वाघाडे, शाळेचे मुख्याध्यापक धनराज सोनवणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

        विद्यार्थ्यांच्या कामगिरी साठी शाळेचे क्रीडाशिक्षक निलेश कुमरे, विषय शिक्षक, गुणवंता खोरगडे स.शी., कु मंजुषा पवार स.शी., अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे अनिकेत दुर्गे यांनी परिश्रम घेतले. (aamcha vidarbha)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top