Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान द्या - शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तहसीलदारांना दिले निवेदन आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. 27 सप्टेंबर 2023) -         जिवती तालुक्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन हाती...

तहसीलदारांना दिले निवेदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. 27 सप्टेंबर 2023) -
        जिवती तालुक्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. त्यातही पांढरी माशी, मोजक आणि खोंडळी लागल्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट असून त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट आले आहे. जिवती तालुक्यातील शेतकरी हा हताश झाला असून हाती आलेले पीक गेल्यामुळे चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका रुपयात विमा काढलेला आहे. शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभ द्यावा व ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांना एकरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात द्यावे या आशयाचे निवेदन तहसीलदार जिवती यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार, शिवसेना तालुका संघटक गणेश पवार, मुनजाजी बर्वे, कपिल राठोड, चंद्रकांत पुकट्वाड, राजू कुमारे, अरुण भोगे, जालीम कोडपे उपस्थित होते (jiwati) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top