Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: योगेश पुटावार ठरला नांदा गावातील पहिला अग्नीवीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंग शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. 27 सप्टेंबर 2023) -         कोरपना तालुका येथील नांदा गावातील राजू पुट्टावार ...
आमचा विदर्भ - धनराजसिंग शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 27 सप्टेंबर 2023) -
        कोरपना तालुका येथील नांदा गावातील राजू पुट्टावार यांचा मुलगा योगेश हा अत्यंत शांत संयमी व सुस्वभावी, घरची परिस्थिती पाहिजे तेवढी चांगली नाही, वडील कंत्राटी कामगार, फक्त ते दहा ते बारा हजाराच्या पगारावर अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यात नोकरी करणारे. ना शेती, ना वाडी मात्र योगेशच्या मनात देशाची सेवा करण्याविषयीचे स्वप्न त्याने लहानपणा पासूनच उराशी बाळगले होते. प्राथमिक शिक्षण शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल नांदा व माध्यमिक शिक्षण त्याने श्री प्रभू रामचंद्र विद्यालय नांदा येथे घ्यायला सुरुवात केली वर्ग अकरावीला असताना पासूनच दिवसातून कमीत कमी पाच ते सहा तास स्वामी विवेकानंद वाचनालय येथे घालवायचा त्यानंतर सैन्या निवडी करता लागणाऱ्या विविध कसरती व व्यायाम प्रकाराचा सराव करायचा यातच अग्निवीर सैन्य भरतीची जाहिरात निघताच त्याने तयारी जोमात सुरू केली व पहिल्याच प्रयत्नात त्याला यश प्राप्ती झाली. विशेष म्हणजे नांदा गावातील तो पहिला अग्नीवीर ठरण्याचा मानकरी झाला आहे. आता तो वर्ग बारावी विज्ञान शाखेत शिकत असून विविध खेळ प्रकार धावणे, कबड्डी, क्रिकेट यामध्ये सुद्धा प्राविण्य प्राप्त आहे. अग्निवीर सैन्य दलात निवड झाल्याबद्दल संपूर्ण गावकरी, प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, खेळ प्रशिक्षक प्रमोद वाघाडे मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. योगेश सारखेच प्रयत्न इतर नवयुकांनी सुद्धा करावे असे योगेश राजू पोटावर यांनी आवाहन केले आहे. (gadchandur) (aamcha vidarbha) (agnivir)



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top