Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिवती तालुक्यातील विविध मागण्यां करिता मस्की दाम्पत्यांचे ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स जिवती (दि. 27 सप्टेंबर 2023) -         जिवती तालुक्यातील विविध मागण्यांकरिता भारत राष्ट्र समितीचे बाबाराव मस्...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती (दि. 27 सप्टेंबर 2023) -
        जिवती तालुक्यातील विविध मागण्यांकरिता भारत राष्ट्र समितीचे बाबाराव मस्की व शोभा मस्की हे दोघेही दि.15 ऑक्टॉबर 23 पासून मागण्या पूर्ण होईपर्यंत बस स्टॅन्ड जवळील हनुमान मंदिराच्या आवारात दोघेही अंगावर काळे वस्त्र परिधान करून व अंगावर लोखंडी बेड्या घालून आंदोलने करणार आहे. बाबा मस्की यांनी सांगितले कि, ते व त्यांची अर्धांगिनी शोभा मस्की हे या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन व आमरण उपोषणाला बसत आहे. 

मागण्या - 
  • वन जमीनी व सरकारी जमीन व शेती कब्जेदार असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती पट्टे सातबारा त्वरीत मिळावे, वार्षिक सरकारी अनुदाने जसे एकरी 10 हजार रूपये, सरकारी योजना, विहीरी, बोरवेल पंप, कुकुडपालन, शेळ्या, मेंढ्या, गाई, पॉली हाऊस, ग्रिन नेट हाऊस मच्छी पालन योजना वगैरे करणे. शेतात विद्युत लाईन टाकणे व शेतीपर्यंत जाण्यासाठी पायदान रस्ता बनविने.
  • देशात असलेल्या गावातील व शहरातील गावठाण जमिनीवर, महसुल जमिनीवर, नजुल जमिनीवर व वन जमीनीवर असलेल्या घरांना व झोपड्यांना घरपट्टे देण्यात यावे. सरकरी योजना, घरकुल, संडास, विज, नाल्या, रस्ते देणे. 
  • शेतमालाला नष्ट करणाऱ्या वन्यप्राण्याचे बंदोबस्त करावे. शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई वाढवावीव. वन्य प्राण्यांमुळे जिवीत हानी झालेल्यांना 25 लाख विम्याची रक्कम द्यावी. रानडुकरांचा बंदोबस्त करणे. 

        देशात 60 करोड जनतेला घर पट्टे व शेती पट्टेचा प्रश्न भेडसावत आहे. त्या प्रश्नासाठी कुणी नेता व पक्ष समोर येत नाही. आता या प्रश्नासाठी मस्की दांम्पती आले आहे. मस्की यांनी लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top