Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवसेना राजूरा विधानसभा क्षेत्राच्या संपर्क प्रमुखपदी दत्तात्रय बईतवार यांची नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२३) -         शिवसेना नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२३) -
        शिवसेना नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार चंद्रपुर जिल्ह्यातील चंद्रपुर व राजुरा विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना पक्षाच्या संपर्क प्रमुखपदी दत्तात्रय बईतवार (dattatray bataiwar) यांची नियुक्ती करण्यात आली. (shivsena)

        बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या माणसाला मिळावा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सध्याची परिस्थिती जाणून घेवुन जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचार व प्रसार करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी जिल्ह्यातील चंद्रपुर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्याकड़े विशेष लक्ष कसे देता येईल. तसेच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून कसे आणता येईल शिवसेना पक्ष कशा मजबूत करता येईल, याअनुसंगाने सदर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राजुरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाची पिछाडी सुरु असून शिवसेना राजूरा विधानसभा क्षेत्राच्या संपर्क प्रमुखपदी दत्तात्रय बईतवार यांची नियुक्ती झाल्यानंतर यात काही बदल होईल का कि हि नियुक्ती हि प्रसिद्धी पर्यंतच राहील याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. (rajura) (aamcha vidarbha)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top