Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संतोष पारखी यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. २९ सप्टेंबर २०२३) -        भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २९ सप्टेंबर २०२३) -
       भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा केदारे यांनी दि. 22 सप्टेबर 2023 ला शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा चंद्रपुर सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीचे, माजी अशासकीय सदस्य संतोष पारखी यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति करण्यात आली. 

        संपूर्ण भारतात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती कार्यरत असून ग्राहक संरक्षण कल्याण हक्क कायदा 1986/2019 अंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, सहकारी क्षेत्रातील कामे करण्यासाठी तसेच ग्राहक पद्धती, कायदेविषयक ज्ञान, सामाजिक कार्य व स्वतःची इच्छाशक्ति लक्षात घेवून संतोष पारखी यांची चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी सर्व अधिकाऱ्याच्या सहमतीने नियुक्ति करण्यात आली आहे. 

        त्याचप्रमाणे जागे व्हा ग्राहकांनो, जागे व्हा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हा, तहसील, प्रभाग व गाव पातळीवर शाखा उभारणीसाठी इच्छुक, जाणकर व्यक्ति आणि कायदेशीर अधिकारी नेमण्याचे अधिकार देण्यात आलेले असून संतोष पारखी यांनी ग्राहकांच्या अधिकाऱ्याची व सदस्याची संख्या वाढविण्याची प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. 

        सदर निवड करण्याकरीता ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या अनमोल मार्गदर्शन व रणरागिनी राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.सौ. आशाताई पाटील व नागभीड तहसील अध्यक्ष गिरीश नवघड़े यांच्या शिफारशीनुसार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा केदारे, राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मंगेश मोहिते यांच्या सहीनिशी सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्याच्या सहमतीने करण्यात आली. (chandrapur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top