Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: या बावनकुळे साहेब मग ढाब्यावरच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डिजिटल मीडिया असोसिएशनने भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ढाब्यावर केले निमंत्रित आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. २९ सप्टेंबर...

डिजिटल मीडिया असोसिएशनने भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ढाब्यावर केले निमंत्रित
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. २९ सप्टेंबर २०२३) -
       भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी पत्रकार हे टिल्लूपंप आहेत, तुम्ही त्यांना चहा पाजलात किंवा ढाब्यावर घेऊन गेलात तर बातम्या प्रसिद्ध करतात, असे सांगून पत्रकारांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकार दुखावले असून त्यांच्यावर सर्वत्र निषेध प्रकट केला जात आहे. (Digital Media Association invited BJP state president Bawankule to the dhaba)

        या मालिकेत आज बावनकुळे यांना चंद्रपुरात ही निषेध करण्याचा निर्णय डिजिटल मीडिया संस्थेने घेतला आहे. डिजिटल मीडिया संस्थेने "या बावनकुळे धाब्यावर" या नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असून त्यांनी बावनकुळे यांना रविवार, 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील लोहारा ढाब्यावर रात्री 8:00 वाजता सावजी भोजनासाठी आमंत्रित केले आहे. बावनकुळे साहेबांनी आम्हाला ढाब्यावर पत्रकारांना अनेकदा खाऊ घातला आणि चहाही दिला, त्यामुळे आता त्यांच्यासाठी आमच्याकडून ही रिटर्न गिफ्ट पार्टी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या निमंत्रित मेजवानीला बावनकुळे साहेब आले नाहीत तर मात्र त्यांचा तिथे निषेध करण्यात येईल. येत्या नवरात्रीच्या काळा पासून त्यांच्या जिभे मधून कोणतेही वाईट शब्द येऊ नयेत यासाठी गणेशाने त्यांना सदबुद्धी आणि वरदान द्यावे, अशी प्रार्थनाही संस्थेने केली आहे.

        संस्थेच्या या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगाड, राजेश नायडू, दिनेश एकवणकर, जयपाल गेडाम यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (chandrapur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top