Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रहार चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी सतीश बिडकर व शेरखान पठाण यांची नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रहार दिव्यांग आंदोलन क्रांतीच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज माणूसमारे यांची नियुक्ती आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (...

प्रहार दिव्यांग आंदोलन क्रांतीच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज माणूसमारे यांची नियुक्ती
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ३० सप्टेंबर २०२३) -
        प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी सतीश बिडकर व शेरखान पठाण तर प्रहारचे दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष पंकज माणूसमारे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.

        सतीश बीडकर यांच्या कडे चंद्रपूर बल्लारपूर, मुल पोंभूर्णा, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी ची जिम्मेदारी आणि शेरखान पठाण यांच्याकडे भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली हे तालुके देण्यात आले. कोणत्याही टोकाच्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास होऊ नये या हेतूने योग्य निर्णय घेतला. 

        प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे २६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर  दौऱ्यावर आले असताना त्यांच्या आदेशाने या निवडी करून नियुक्तीपत्र देण्यात आले. सतीश बिडकर, शेरखान पठाण व पंकज माणूसमारे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळात प्र-हार पक्षाचे व बच्चू यांचे विचार रुजवण्यासाठी सतत काम करत राहणार. प्रश्न मार्गी लावण्या करिता कटीबद्ध राहील असा बिडकर यांनी विश्वास दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात पक्षाची मजबुत बांधणी करत बच्चू भाऊच्या विचारांना बळकटी देण्याचा निर्धार शेरखान पठाण व पंकज माणूसमारे यांच्याकडून करण्यात आला. 

        यावेळी स्वीय सहाय्यक अमित वानखेडे, संजय गोमकाळे, अतुल निमरड, अमित बहादुरे, अक्षय बोंदगुलवार, गणेश उराडे, संदीप झाडे विशाल कुडे, अमोल दातारकर, हर्षल ढोके, अमोल काटकर, ओंकार कांबळे, परमेश्र्वर वाघमारे, अनुप राखुंडे, नितेश कोडपे व जिल्हाभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. (gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top