Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गणेश भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हजारो गणेश भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ माजी नगराध्यक्ष विलास बोनगीरवार यांच्या संकल्पनेतून सुंदर आयोजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे र...

हजारो गणेश भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
माजी नगराध्यक्ष विलास बोनगीरवार यांच्या संकल्पनेतून सुंदर आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ३० सप्टेंबर २०२३) -
        काल राजुरा शहरातून निघणार्‍या श्री गणेश विसर्जन मिरवणूकीचे औचित्य साधून येथील प्रतिष्ठित व्यापारी, राजुरा आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष 
 व माजी नगराध्यक्ष विलास सावकार बोनगीवार (Vilas Savkar Bongirwar) कुटुंबियांकडून पोस्ट ऑफिस जवळील त्यांच्या दुकानाजवळ सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे श्रीफळ, पुष्पगुच्छ देत स्वागत करत श्री गणेश विसर्जन मिरवणूकी बघण्याकरिता आलेल्या श्रीगणेश भक्तांकरिता मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, विनायक देशमुख, नंदू पुराणिक, बंडूभाऊ साळवे, केशवराव ठाकरे, गुंडावार, मयूर बोनागिरवार सह मान्यवर उपस्थित होते. बोनगीवार कुटुंबियांकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top