Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मुस्लिम समाजाने दिला सामाजिक एकोप्याचा संदेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा येथे मुस्लीम बांधवांकडून गणेश मंडळांचा सत्कार व केळी, पाणी बाॅटल वाटप आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ३० सप्टेंबर २०२३) -...

राजुरा येथे मुस्लीम बांधवांकडून गणेश मंडळांचा सत्कार व केळी, पाणी बाॅटल वाटप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ३० सप्टेंबर २०२३) -
        मुस्लिम समाजाने सामाजिक एकोप्याचा संदेश देत शहरातून निघणार्‍या श्री गणेश विसर्जन मिरवणूकीचे औचित्य साधुन राजुरा मुस्लीम समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राजुरा येथे गणेश मंडळाच्या प्रमुखांना शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करत सत्कार करण्यात आला. तसेच गणेश भक्तांना केळी, पाणी वाटप करण्यात आले. 
        दरवर्षी राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांकडून श्री गणेश मूर्तीच्या स्थापना केल्या जातात व पौर्णिमेच्या दिवशी ढोल ताश्याच्या व विविध देखावे सादर करीत श्री गणेशाला निरोप देत असते. यावर्षी सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांचा सहभाग होता. शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या राजुरा शहरात ईदच्या दिवशी सर्व धर्मियांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक एकोप्याचा एकतेचा संदेश दिला होता, तर दुसऱ्या दिवशी मुस्लीम समाजांनी गणेश मंडळांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या व गणेश भक्तांना केळी, पाणी वाटप करण्यात आले. 

        यावेळी नसीर उल्ला बेग, निजाम बुखारी, सैय्यद शहेजाद अली, बाबा बेग, ऐजाज अहेमद, शाहनवाज कुरेशी, रकीब शेख, शब्बीर पठाण, अब्दुल फारुख, शहबाज कुरेशी, फारुख शेख, मतीन कुरेशी, आसीफ सैय्यद, मोहम्मद नाफे शेख, सैय्यद जाकीर, सालम चाउस, अब्दुल जुनेद, रियाज कुरैशी, वसीम शेख, मोहम्मद कबीर कुरैशी, जियाऊल हक,जावेद सिद्दिकि, फिरोज शेख व अनेक मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top