Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सेवा पंधरवडा अंतर्गत बस स्थानक परिसर केला स्वच्छ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देवराव भोंगळे यांच्या हस्ते सफाई कामगाराचा सत्कार आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १ ऑक्टॉबर २०२३) -         सेवा पंधरवडा ‘स्वच्छत...
देवराव भोंगळे यांच्या हस्ते सफाई कामगाराचा सत्कार
आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १ ऑक्टॉबर २०२३) -
        सेवा पंधरवडा ‘स्वच्छता हीच सेवा अभियानाच्या’ (Cleanliness is the service mission) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे (Devrao Bhongle) यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी राजुरा बसस्थानक परिसरात भाजपा पदाधिकारी, वनविभाग व राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ‘एक तारिख, एक तास आणि एक साथ’ या संकल्पनेनुसार स्वच्छतेसाठी सामुहिक श्रमदान केले. 

        यावेळी बस स्थानक परिसरात राज्य परिवहन महामंडळ विभागाचे सफाई कामगार संदिप सोनेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान ही केला. याप्रसंगी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी महात्मा गांधी स्वच्छता भारत अभियानाची सुरुवात केली, यामाध्यमातून मोदीजींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पसरवत स्वच्छतेसाठी कृतिशील लोकचळवळ निर्माण केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सामुहिक स्वच्छता करून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अशी भावना देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली. 

        यावेळी तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती सुनिल उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, बसस्थानक प्रमुख मानिक बोबडे, क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, भाऊराव चंदनखेडे, सुरेश रागीट, मिलिंद देशकर, विनोद नरेन्दुलवार, सोमेश्वर आईटलावार, पत्रकार संघाचे अनिल बाळसराफ, श्रीकृष्ण गोरे,  फारुख शेख, डॉ. उमाकांत धोटे, दीपक झाडे, उज्ज्वलाताई जयपुरकर, शुभांगीताई रागीट, शितलताई वाटेकर, ममताताई भोयर, वनरक्षक सुनिल गज्जलवार, संदिप तोडासे, मारोती चाफले, सामाजिक वनीकरणाचे वनपाल सुनिल मेश्राम, वनमजुर देवाजी शेंडे, गंगाधर भेंडारे, मयुर आत्राम, भाऊराव लांडे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. (aamcha vidarbha) (rajura) (BJP)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top