Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली वन्यप्राण्यांची माहिती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाळेत अवतरले वाघ, चिता, सिंह आणि अन्य प्राणी विविध प्राण्यांच्या वेशभूषेने व आवाजांनी वेधले सर्वांचे लक्ष आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे रा...

शाळेत अवतरले वाघ, चिता, सिंह आणि अन्य प्राणी
विविध प्राण्यांच्या वेशभूषेने व आवाजांनी वेधले सर्वांचे लक्ष
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १ ऑक्टॉबर २०२३) -
        ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कुल राजुरा या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता चक्क वाघ, सिंह, चित्ता, अस्वल, हत्ती, माकडं, जिराफ, ससे यासह अनेक प्राणी शाळेत बघून बालगोपालांचा आनंद गगनात मावेना. आपल्यालाही आश्चर्य वाटले असेल ऐकूण या शाळेतील विद्यार्थ्यांनी जंगली प्राणी, पाळीव प्राणी, मांसाहारी, शाकाहारी प्राणी ह्यांचे चित्र, आकार, आवाज, खानपान आणि त्यांचा निवारा यासह अनेक महत्वपूर्ण बाबीं बालवयातच कळाव्या याकरिता शाळेतच झु पार्क तयार करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. अगदी प्रवेशद्वारा जवळ सुरुवातीलाच तिकीट केंद्र तयार करून सुरुवातीलाच तिकीट काढून झु पार्क मधे प्रवेश दिल्या जात होता. आतप्रवेश करताच विविध प्रकारचे प्राणी, त्यांचा निवारा, खाद्य आणि मोठमोठ्याने येणारे आवाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनीही हा अनुभव अगदी हसतखेळत आणि आनंदाने स्वीकारला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिंगापूर प्याटर्न वर आधारित शिक्षण या शाळेतून दिले जाते. प्ले स्कुल ते के जी 2 पर्यंतचे वर्ग या शाळेत असून अगदी लहान मुलं अभ्यासा व्यतिरिक्त रंग, आकार, दिवस, वार, महिने तसेच प्रत्येक संस्कृतीवरील विविध सणसमारंभ प्रत्यक्षपणे उपक्रमाच्या माध्यमातून राबवून त्याविषयीची माहिती अनुभवतात. शाळेत बाजार भरवून विद्यार्थ्यांना भाजीपाला, फळभाज्या, मोजमाप याचे ज्ञान दिले जाते तर पर्यावरण पूरक गणेशोत्सव, तान्हा पोळा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी,ख्रिसमस नाताळ असे उपक्रम घेतले जातात. बालवयातच हसतखेळत व विविध उपक्रमांच्या साह्याने शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीतच नावारुपास आली आहे. याकरिता या शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि सौ जयश्री मालेकर, तसेच केंद्र संचालक अँड. मनोज काकडे व ब्रँच इंचार्ज शुभांगी धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती गायधने, पूजा इटनकर, आयेशा कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात येतात. याकरिता ममता व अर्चना या मदतनीस चे सहकार्य लाभले. या  झु पार्क ला पालकांनीही मोठया संख्येने भेटी दिल्या व मुलांचे कौतुक केले. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top