Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विरूर ठाणेदारांनी राबविला स्वच्छता अभियान व वृक्षसंवर्धन मोहिम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी  विरुर स्टेशन (दि. १ ऑक्टॉबर २०२३) -         स्वच्छ भारत अभियाना अंतर्ग...

युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी 
विरुर स्टेशन (दि. १ ऑक्टॉबर २०२३) -
        स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता सेवा 2023 पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे, महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून विरुर ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी युवकांचा उत्साह वाढविण्यासाठी येथील युवकांना स्वच्छता मोहीमे बद्दल आवाहन केले, त्यांच्या आवाहनाला मन देत सकाळी दहा वाजता विरूर ठाण्यातील आवारात एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विरुर ठाण्यातील परिसर स्वच्छ करून वृक्षसंवर्धन करण्यात आले. (Police Station Wirur)

        पर्यावरण विषयी असलेले प्रेम व वृक्षसंवर्धनाची आवड जोपासत ठाणेदार निर्मल यांनी विरुर ठाण्याचा चेहरामोहरच बद्दलविला, तिथे असणारी फुलझाडे, विविध फडझाडे व बापू कुटी ही अधिकच आकर्षित करते त्यामुळे विरुर येथील युवक ठाणेदारांची पर्यावरण व स्वच्छते विषयी असलेली कळकळ बघता विरुर येथील युवकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

        लोकसहभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थ व युवकांनी आपल्या गावाला स्वच्छ व सुंदर पुढाकार घ्यावा असे उपस्थितीना आवाहन करण्या आले. यावेळी उपस्थितींना पोलीस विभागाकडून टी शर्ट चे वितरण करण्यात आले. स्वच्छता मोहिमेच्या यशस्वितेकरिता सरपंच अनिल आलाम, उपसरपंच प्रीती पवार, तंटामुक्त अध्यक्ष भीमराव पाला, शांतता समिती सदस्य अविनाश रामटेके, अजय रेड्डी, अजित सिंग, प्रदीप पाला, शाहू नारनवरे, शंकर झाडे, गजानन ढवस, सचिन बल्की तसेच पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura) (wirur station)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top