Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पांढरपोवनी रेल्वे साईडिंग येथून कोल लोडिंग बंद करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाजनको व मध्य प्रदेश पावर प्लांट खंडवा ला देत आहे भेसडयुक्त व काळे दगडमाती मिश्रित कोळसा सामाजिक कार्यकर्ता तथा ट्रेड यूनियन एक्टिविस्ट विज...

महाजनको व मध्य प्रदेश पावर प्लांट खंडवा ला देत आहे भेसडयुक्त व काळे दगडमाती मिश्रित कोळसा
सामाजिक कार्यकर्ता तथा ट्रेड यूनियन एक्टिविस्ट विजय ठाकरे यांनी लावले रेलवे साइडिंग वरून निकृष्ट दर्जाचे कोळसा पुरवठा करण्याचे आरोप
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ०७ डिडिसेंबर २०२३) -
        राजुरा तालुक्यातील पांढरपोवनी रेल्वे साईडींग वरून महाजनको कोराडी-चंद्रपूर व मध्य प्रदेश विद्युत निर्मिती कंपनी खंडवा यांना निकृष्ट दर्जाचे व मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त कोळशाचा पुरवठा या ठिकाणावरून केल्या जात आहे. यामध्ये येथील कोल वाशरीजचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचा मोठा आरोप सामाजिक कार्यकर्ता तथा ट्रेड यूनियन एक्टिविस्ट विजय ठाकरे यांनी केला आहे. एमपीसीबी मुंबई मुख्यालयला एका पत्राद्वारे पांढरपोवनी रेल्वे साईडिंग राजुरा सोबतच जिल्हातील अन्य रेल्वे साईडिंग येथून कोल लोडिंग बंद करण्याची मागणी एमपीसीबी मुंबई मुख्यालयी केली आहे. (Mahajanco and Madhya Pradesh Power Plant are supplying mixed coal with adulterated and black stone to Khandwa)

        एसीबी कोल बेनिफिशअरी आणि यांचीच एक दुसरी कोलवाशरी कार्तिकेय आयरन कोलवाशरी या दोन्ही वाशरीज मधून महाजनकोला स्टार कोल् -आयरनोर व काळे दगडमाती मिश्रित कोळसा रेल्वे साईट वरून रेल्वे अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन रेल्वेद्वारे विविध पावर प्लांट ला सप्लाय केला जातोय. महाजनकोने यापूर्वी देखील कबूल केल आहे की कोल् वाशरीज कडून निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा करताना आढळले आहे आणि त्यामुळे नुकसान होते परंतु अशा कोलवाशरीवर आम्ही वेळोवेळी कारवाई करतो, हे जरी खरी असले तरी हे संगणमत आणि आपसी सहमतीने हा खेळ होते. त्यामुळे हा प्रकार महाजनकोचे अधिकारी यांना सोबत घेऊन करत असल्यामुळे क्वालिटी कंट्रोल विभागा ला सोबत घेऊन करत असल्या मुळे हा भ्रष्टाचार कसा आटोक्यात येईल हे न सांगने कठीण आहे. (Social activist and trade union activist Vijay Thackeray)

        प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे औद्योगीकरण बघता देशात सर्वात प्रदूषित तिसऱ्या क्रमांकाचा चंद्रपूर शहर व जिल्हा यांचा नंबर येतो आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वायु तथा जल प्रदूषण यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे परंतु ज्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रदूषण व वातावरणीय बदल रोखण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याची जबाबदारी असताना या विभागाचे अधिकारी मोहमायेच्या हव्यासापोटी नागरिकांचा बळी घेत आहे. यांना सर्व कल्पना असताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी चा उपाय योजना करण्यासाठी उद्योगाला बंधनकारक करणे प्रदूषण नियंत्रण नियंत्रणात रहावे यासाठी उपाययोजना आराखडा तयार करणे इत्यादी गोष्टी असताना देखील दिसण नाही. 

        याउलट पर्यावरण व वातावरणीय बदल कायदा 1986 - वॉटर प्रिव्हेन्शन व एअर प्रिव्हेन्शन एक्ट चा हवाला देऊन विविध प्रकारच्या कारवाई करण्याचे नोटिसेस उद्योगाना इशू करतात आणि नोटिसेसच्या माध्यमातून उद्योगांना कार्यवाहीची भीति दाखऊन फक्त मोहमाया गोळा करतात आणि त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात न राहता वाढतच चाललेले आहे. याचा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. महाराष्ट्र शासनाने या विभागाला त्यांची नागरिकांप्रती असलेली जबाबदारी निश्चित करून कार्य करण्यासाठी बाध्य करावे व त्याच प्रमाणे मध्य प्रदेश पावर प्लांट खंडवा आणि महाजनको महाराष्ट्र या दोन्ही कंपन्यासाठी पांढरपोवनी रेलवे साइडिंग व जिल्ह्यातील अन्य रेलवे साइडिंग कोल लोडिंग साठी बंद कराव्यात अशी मागणी विजय ठाकरे सामाजिक कार्यकर्ता तथा ट्रेड यूनियन एक्टिविस्ट यांनी एमपीसीबी मुंबई मुख्यालयी केली आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top