आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ३० नोव्हेंबर २०२५) -
चंद्रपूर येथे सौ. ज्योती व शंकर जंगलूजी दरेकर यांची कन्या चि.सौ.कां. बंदिनी आणि सौ. रेखा व रामराव मोतीरामजी लोहारे यांचे चिरंजीव विपुल यांचा शुभविवाह गुरुदेव पद्धतीने उत्साहात, तसेच अध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. विवाह सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विवाहसंबंधी आदर्श संकल्पना विशेषरित्या अधोरेखित करण्यात आल्या. ग्रामगीतेचा स्वर, संस्काराचे तेज आणि परिवाराचा मंगलभाव यांचा सुंदर मेळ विवाहसोहळ्यात पाहायला मिळाला.
ग्रामगीतेतील ‘‘चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह… यासाठीच योजीला विवाह’’ या ओळींचा उल्लेख करत मान्यवरांनी विवाह हा फक्त दोन व्यक्तींचा संबंध नसून समाजोन्नतीची पवित्र प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. लग्न हे केवळ संसार थाटण्याचे साधन नसून त्याग, संयम, टापटीप, नियमितता, आदर्श आचरण आणि समाजहिताची तयारी शिकवणारी शाळा असल्याचे सांगण्यात आले.
विवाहाच्या शुद्धतेतून राष्ट्रनिर्मिती घडते, यातूनच श्रेष्ठ संततीचा विकास होतो, असे विचार मांडताना ‘‘प्रजातंतू खंडू नये’’ हा ग्रामगीतेतील मुख्य विवाहधर्मही अधोरेखित करण्यात आला. तुकड्यादासांच्या ‘‘दोन हातांनी नव्हे, चार हातांनी समाजसेवा करा’’ या संदेशाचा उल्लेख करून नवदांपत्यानेही आदर्श कुटुंबजीवनातून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘‘सर्व धनामाजी सुपुत्र धन, वाढवी राष्ट्राचे गौरवस्थान’’ या ओळींद्वारे संस्कारक्षम, राष्ट्रनिष्ठ संतती घडविण्यात विवाहाचे असलेले स्थानही स्पष्ट केले गेले.
विवाह सोहळ्याचे सुत्रसंचालन वर्धेतील सप्तखंजेरी वादक इंजि. भाऊसाहेब थुटे यांनी केले. मार्गदर्शक म्हणून सुबोध दादा, अड्याळ टेकडी ब्रम्हपुरी येथील भुवैकुंठ आत्मानुसंधानच्या सुश्री रेखाताई बुराडे, प्रमुख उपस्थितीत वा.ग. वैद्य गुरूजी, वरोरा, बा.दे. हांडे, वर्धा, संत वामनबाबा पावडे, हीरापुर, बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर, सौ. आशाताई किनगे, बेंगलोर, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुश्री गंगाताई काकडे, अशोकराव धमाने, मारोतीजी नौकरकार तसेच हजारो आमंत्रितांनी उपस्थित राहून नवदांपत्यावर प्रेम, आशीर्वाद व मंगलकामना व्यक्त केल्या.
#VipulBandiniWedding #GurudevPaddhati #GramgeetaTeachings #TukdojiMaharaj #CulturalWedding #SpiritualUnion #IndianTraditions #ChandrapurEvents #BlessingsAndValues #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.