Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विरुर येथे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बवेजा यांनी केले गरजू रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी विरुर स्टेशन (दि. 7 डिसेंबर 2023) -           स्व...

बवेजा यांनी केले गरजू रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरुर स्टेशन (दि. 7 डिसेंबर 2023) -  
        स्व.सौ पुष्पादेवी महेंद्र पलोड इंदोर यांच्या स्मृती प्रित्यर्थ लायन्स क्लब चंद्रपूर, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम वर्धा,आरोग्य विभाग चंद्रपूर, ग्रामीण रुग्णालय राजुरा तसेच गुरुद्वारा सिंग सभा विरुर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विरूर येथे 9 डिसेंबर शनिवार ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व कृत्रिम भिंगारोपन मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुद्वारा सिंग सभा चे प्रमुख सुरेंद्रपाल सिंग बवेजा यांनी केले आहे. (wirur station)

        या शिबिरात सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ हॉस्पिटल चे नेत्रतज्ञ डॉ.अजयकुमार शुक्ला, चंद्रपूर चे सिव्हिल सर्जन डॉ. महादेव चिंचोले हे उपस्थित राहणार आहेत. शिबिरात निवड झालेल्या रुग्णांची मोफत कृत्रिम भिंगरोपन शस्त्रक्रिया सेवाग्राम येथे नेत्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शना खाली करण्यात येईल. रुग्णांना गुरुद्वारा सिंग सभा विरुर स्टेशन ते सेवाग्राम नेण्यासाठी व वापस आणण्याची सोय लायन्स आय हॉस्पिटलच्या बसने मोफत करण्यात येईल तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना निवास भोजन औषधे विनामूल्य मिळतील व डोळ्याच्या संरक्षण साठी मोफत चष्मे मिळतील तेव्हा गरजू रुग्णांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सुरेंद्रपाल सिंग बवेजा, सरपंच अनिल आलाम, ठाणेदार जयप्रकाश निर्मल, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एम. पवार, सतीश कोमरवेलीवार, डॉ. उमप, अजित सिंग टाक, शाहू नारनवरे यांनी केले आहे. (wirur station) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top