Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ना.सुधीर मुनगंटीवार करणार नागरिकांच्या तक्रारीचे निवारण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर येथील नियोजन भवनात "महाजनसंपर्क" चे आयोजन आमचा विदर्भ -  दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २९ नोव्हेंबर २०२३) -         चंद्रपूर ज...

चंद्रपूर येथील नियोजन भवनात "महाजनसंपर्क" चे आयोजन
आमचा विदर्भ -  दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २९ नोव्हेंबर २०२३) -
        चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याकरीता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे ‘महाजनसंपर्क’ घेणार आहेत. 

        शुक्रवार, १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०४ ते रात्री ०८ वाजेपर्यंत ना. मुनगंटीवार प्रत्यक्ष नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. नियोजन भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत ते जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देणार आहेत. (Sudhir Mungantiwar)

         आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी नागरिक वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या कार्यालयांच्या फेऱ्या मारत असतात. परंतु अनेकदा त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना अशा गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यातून ते शुक्रवारी ‘महाजनसंपर्क’ घेणार आहेत. या महाजनसंपर्काचा जिल्ह्यातील समस्त शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top