Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाला यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुमठाना पुल बांधकामासाठी ४.९० कोटी रू. मंजूर आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २९ नोव्हेंबर २०२३) - राजुरा तालुक्यातील मौजा सुमठाना ग्रा...

सुमठाना पुल बांधकामासाठी ४.९० कोटी रू. मंजूर
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ नोव्हेंबर २०२३) -
राजुरा तालुक्यातील मौजा सुमठाना ग्रामपंचायत सदस्य मनिषा धनराज देवाळकर यांनी दि. ०१/०८/२०२१ रोजी निवेदनाद्वारे तसेच गावातील नागरिकांनी आ. सुभाष धोटे यांच्याकडे सुमठाणा ग्रा. मा. ३२ पोचमार्गावरील नाल्यावर अगदि कमी उंची असलेल्या रपट्याचे बांधकाम करण्यात आल्याने रपट्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेकांची जणावरे वाहुन जात आहेत. या मार्गाने सुमठाणा, बोडगाव येथील नागरीकांची नेहमीत वर्दळ असते.  शालेय विद्यार्थी, कामगार, इतर नागरीक शिक्षण व रोजगाराकरीता राजुरा येथे ये जा करतात. अचानक आलेल्या पावसामुळे त्यांना पुलावरून पाणी वाहत असतांना २ ते ३ तास पाणी कमी होई पर्यंत प्रतिक्षा करावी लागते. पाण्याच्या अशाच प्रवाहात एका मुलाला आपला जिव गमवावा लागला. कित्येक वेळा शेतकन्यांची जनावरे सुध्दा वाहून गेली आहेत. तसेच दिनांक २१/०९/२०२३ रोजी सकाळी १० वाजता जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. विनोद मेश्राम शाळेत जात असतांना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहुन गेले येथील नागरीकांच्या सर्तकतेने वेळीच नागरीकांनी मदत करून त्यांना वाहत जात असतांना बाहेर काढल्याने जिवीत होणी टळली. मात्र यावर उपाय योजना न झाल्यास भविष्यात असेच अपघात घडुन अनेकांना आपले जीव गमवावे लागतील ही गंभीर बाब लक्षात घेवुन सुमठाणा ग्रा. मा. ३२ पोचमार्गावरील पुलाचे बांधकाम करणेबाबत तातडीची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी मुख्य अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन सुमठाना येथे पोचमार्गावर पुल बांधकामासाठी मंजुरी देऊन ४ कोटी ९० लक्ष रुपये निधीची तरतूद केली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून स्थानिक नागरिकांनी आ. सुभाष धोटे (subhash dhote) यांचे आभार व्यक्त केले आहे. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top