आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २९ नोव्हेंबर २०२३) -
नुकतेच सतत दोन दिवसा पासून राजुरा विधान सभा क्षेत्रा सह चंद्रपुर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने लाखो एकर शेती कापूस व धान पिकासह फळ बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने हजारो शेतकरी चिंतेत दिसत आहेत. माणूसकी जपत मुखयमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सर्व विभागीय आयुक्त (महसुल) व जिल्हाधिकारी मार्फत पटवारी कर्मचारी व तहसिलदार व कृषी अधिकारी यांचे मार्फत तात्काळ पंचनामे करून प्रति शेतकरी कमीत कमी 3 हेक्टर शेती पर्यंत शेतीचे पिकाचे शेतकरीवर्गाला नुकसान भरपाई जाहीर करावे. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. प्रचलीत पद्धतीने नुकसान व बाधीत शेतपिकाचे युध्दपातळीवर पंचनामे करून तात्काळ निधी देण्यात यावा दिरंगाई केल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) द्वारे विशाल मोर्चा नागपूरात काढण्यात येईल असा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार (Anandrao Angalwar) यांचे नेतृत्वात एका शिष्ट मंडळाद्वारे निवेदनाच्या माध्यमाने देण्यात आला. (aamcha vidarbha) (rajura)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.