Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Justice For Nitesh राजुरा प्रेमसंबंधातून खून प्रकरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Justice For Nitesh राजुरा प्रेमसंबंधातून खून प्रकरण  तिघे अटकेत ; ४ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर! मोटरसायकल अपघाताचा बनाव फोडला; तांत्रिक तपास...
Justice For Nitesh
राजुरा प्रेमसंबंधातून खून प्रकरण 
तिघे अटकेत ; ४ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर!
मोटरसायकल अपघाताचा बनाव फोडला; तांत्रिक तपासाने खऱ्या गुन्ह्याचा उलगडा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा / चंद्रपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
        राजुरा तालुक्यातील सुमठाना येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने ३३ वर्षीय नितेश किसन निमकर याची दिनांक २४ एप्रिल २०२५ च्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि राजुरा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत पुन्हा दोन आरोपींना अटक केली असून आता अटक झालेल्या आरोपीतांची संख्या तीन झाली आहे. 

        दि. २५ एप्रिलच्या सकाळी ६ वाजताच्या दरम्यान, नितेश निमकर याचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि फॉरेन्सिक पथकाच्या सखोल तपासानंतर हे स्पष्ट झाले की ही हत्या होती. पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले की, नंदकिशोर चरणदास सोयाम वय २५ वर्षे याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने नितेश याला बोलावून घेतले आणि लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून जागीच ठार केले. नंतर मृतदेह व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला ठेवून अपघाताचा बनाव केला.

        या प्रकरणी फिर्यादी किसन भगवान निमकर यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी नंदकिशोर सोयाम याच्यासह पोलिसांनी कार्तिक उर्फ गोलू टेकाम व रॉयल कुलसंगे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आता अटक झालेल्या आरोपीतांची संख्या तीन झाली आहे. अटक केलेल्या आरोपींना ४ दिवसांचा पोलिस कोठडी रिमांड (PCR) मिळवण्यात आला आहे.

        सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, स्वामीदास चालेकर, प्रकाश बल्की, किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे, किशोर वाकाटे, शशांक बादामवार, चापोहवा प्रमोद डंबारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोलीस ठाणे राजुरा चे प्रभारी व परि. पोलीस अधीक्षक अधिकारी अनिकेत हिरडे (IPS) यांचे नेतृत्वात सपोनि रमेश नन्नावरे, सपोनि हेमंत पवार, पोउपनि भीष्मराज सोरते, पोहवा अनुप डांगे, पोअं. योगेश पिदुरकर पोस्टे राजुरा आणि फॉरेन्सीक विभागाचे सपोनि पायल शंभरकर यांनी अथक परिश्रम घेत घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top