Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रीय पब्लिक स्कूलच्या अंश येसांबरे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रीय पब्लिक स्कूलच्या अंश येसांबरे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २८ एप्रिल २०२५) -         मह...
राष्ट्रीय पब्लिक स्कूलच्या अंश येसांबरे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २८ एप्रिल २०२५) -
        महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत राष्ट्रीय पब्लिक स्कूल, बामणवाडा-राजुरा येथील पाचवी इयत्तेतील विद्यार्थी अंश बाबाराव येसांबरे याने यश संपादन करत पात्रता प्राप्त केली आहे. शाळेचे संस्थापक मोहम्मद मेहमूद मुसा, अध्यक्ष नदीम शेख आणि मुख्याध्यापिका सौ. स्वाती वाघमारे यांनी अंशचा सत्कार करत त्याचे अभिनंदन केले. त्यांनी अंशला पुढील स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या.

        अंश हा अतिशय होतकरू व हुशार विद्यार्थी असून, शाळेत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो नेहमीच अव्वल स्थान पटकावतो. त्याच्या यशामुळे आई-वडिलांनी मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व शालेय प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. सत्कार समारंभाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षकही उपस्थित होते व त्यांनी अंश येसांबरेचे विशेष कौतुक केले. अंशच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून, त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top