Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: IPS बिरदेव डोणे : संघर्षाची शिदोरी घेऊन यशाच्या शिखरावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
IPS बिरदेव डोणे : संघर्षाची शिदोरी घेऊन यशाच्या शिखरावर मेंढपाळाचा मुलगा IPS अधिकारी : बिरदेव डोणे यांचा संघर्षमय प्रवास आमचा विदर्भ - अनंता...
IPS बिरदेव डोणे : संघर्षाची शिदोरी घेऊन यशाच्या शिखरावर
मेंढपाळाचा मुलगा IPS अधिकारी : बिरदेव डोणे यांचा संघर्षमय प्रवास
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
कोल्हापूर (दि. २८ एप्रिल २०२५) -
        नुकताच जाहीर झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल देशभरात लाखो उमेदवारांसाठी आनंदाचा क्षण ठरला. या प्रतिष्ठित परीक्षेत केवळ काही हजार उमेदवारांनीच यश मिळवले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जळोची गावचा, एका मेंढपाळाच्या घरात जन्मलेला बिरदेव डोणे याने 551 वा क्रमांक पटकावून भारतीय पोलीस सेवेत (IPS) स्थान मिळवले आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही बिरदेवने आपले शिक्षण सुरू ठेवले. पुण्याच्या प्रसिद्ध COEP (College of Engineering Pune) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण काळात अनेक आव्हानांना सामोरे जात असतानाही त्याने हार मानली नाही. पुण्यात असताना प्रांजल चोपडे या सिनियरच्या मदतीने त्याला आधार मिळाला. प्रांजलच खुद्द UPSC मार्फत दोन वर्षांपूर्वी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून नियुक्त झाले होते.

        बिरदेवचा संघर्ष फक्त अभ्यासापुरता नव्हता. वडिलांचे किडनी ऑपरेशन, आर्थिक अडचणी, मेंढरे चारण्याची जबाबदारी अशा असंख्य अडचणींशी सामना करत त्याने आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल हरवल्यानंतरही पोलिसांकडून मिळालेला उपेक्षेचा अनुभव त्याने सकारात्मकतेने घेतला. आज याच बिरदेवने IPS अधिकारी म्हणून यश मिळवलं आहे. भर उन्हात मेंढरे चारताना युपीएससी निकालाची गोड बातमी मिळाल्यावर बिरदेवच्या आयुष्यातील संघर्षाला नवसंजीवनी मिळाली. आज तो देशसेवेच्या नव्या प्रवासाला सज्ज झाला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top