Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सेवानिवृत्त प्रा.अशोक डोईफोडे का कर्मचारी पतसंस्था द्वारा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २५ नोव्हेंबर २०२३) -         गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतस...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २५ नोव्हेंबर २०२३) -
        गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था, गडचांदूर यांच्या वतीने एमसीव्हीसी विभागप्रमुख प्रा.अशोक डोईफोडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांना येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ.प्रभा डोईफोडे, गडचांदूर येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेंद्र देव, सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत धाबेकर, व्यवस्थापक प्रमोद काळे, सुहास डोईफोडे, सुभाष विनोते, डॉ. भोगेकर आदी उपस्थित होते.  
(gadchandur) (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top