Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथे युवक काँग्रेसच्या बूथ जोडो युथ जोडो अभियानाला सुरूवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ नोव्हेंबर २०२३) -         राजुरा तालुका काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे युवक काँ...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ नोव्हेंबर २०२३) -
        राजुरा तालुका काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या पुढाकाराने राजुरा युवक काँग्रेस ची बूथ जोडो युथ जोडो आढावा बैठक उत्साहात पार पडली आणि राजुरा येथून युवक काँग्रेसच्या बूथ जोडो युथ जोडो अभियानाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, युवक काँग्रेसची 'एक बुथ दस युथ' ही संकल्पना अतिशय उत्तम असून तितक्याच ताकदीने या संकल्पला कार्यान्वित करण्यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेणे आवश्यक आहे. आज भारताची खरी ताकद आपला युवक असून युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहेत. अशा कार्यक्षम युवकांना पक्षसंघटनेत संधी देऊन गावागावात, शहराशहरात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

         या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस चे प्रभारी केतन रेवतकर, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, अभिजीत धोटे, राजुरा विधानसभा यु. काँ. अध्यक्ष उमेश गोनेलवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, आर्वी चे सरपंच सुरज माथनकर, कोमल फुसाटे, संदिप नन्नावरे, ग्रा. प. सदस्य श्रीधर रावला, शरद शेंडे, यु. काँ. चे जिल्हा महासचिव प्रणय लांडे, अशोक राव, आकाश माऊलीकर, निरंजन मंडल, श्रीकांत चीतलवार, रोहित नांदे, धनराज सतरे, परितोष पाल यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top