Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिवसेनेची आढावा बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी केले मार्गदर्शन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ नोव्हेंबर २०२३) -         शिवसेना पक्षप्रमुख...

चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी केले मार्गदर्शन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ नोव्हेंबर २०२३) -
        शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार, तसेच पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव (Kiran Pandav), राजुरा, चंद्रपूर, वरोरा विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख दत्तात्रय पैतवार (Dattatraya Paitwar) यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांच्या उपस्थितीत स्थानिक भोई समाज सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Chandrapur District Jilha Pramukh Bandu Hazare)

        जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की, एकनाथ शिंदे यांचे नाव केवळ असेच ‘लोकनाथ’ पडले नाही नाही, एकनाथ शिंदे यांना यासाठी ‘लोकनाथ’ असेही म्हणतात. कारण एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी सक्रियपणे सामाजिक कार्य करत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः हजर राहून कामाचा आढावा घेतात. आपत्तींमध्ये, ते स्वत: दूत बनून पीडित भागात जाऊन गरजूंना मदत करतात. राजकीय गुरू धरमवीर आनंद दिघे साहेब यांनी 'लोकनाथ' होण्याचा मंत्र दिला होता. अशा मुख्यमंत्र्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, पक्ष अधिक बळकट व्हावा, मतदारसंघात अधिकाधिक लोकांना सामावून घ्यावे, बूथ कार्यकर्त्यांना जोडावे, यासाठी शिवसैनिकांनी जनसंपर्क अधिक जोमाने वाढवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (shivsena) (Review meeting)

        यावेळी राजुरा, चिमूर, ब्रह्मपुरी वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख दीपक कामटवार, शिवसेना माजी तालुकाप्रमुख निलेश गंपावार, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरे, शिवसेना उपतालुका प्रमुख राजू गड्डम, शहर प्रमुख कुशाल सूर्यवंसी, जेष्ठ शिवसैनिक केशव वांढरे, नबी खान पठान, सतीश आतुरी, मोरेश्वर भोंगळे, आनंद मस्की, मंगेश डोंगे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top