Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जवाहर नगर माता मंदिर देवस्थान येथे कार्तिक पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोंधळ, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन दोन दिवस रंगणार विविध कार्यक्रमांची मांदियाळी आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२...

गोंधळ, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन
दोन दिवस रंगणार विविध कार्यक्रमांची मांदियाळी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२३) -
        राजुरा शहरातील माता मंदिर देवस्थान, जवाहर नगर महिला माता सेवा समिती द्वारा कार्तिक पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमा महोत्सवात रविवार दि.26 नोव्हेंबर ला सकाळी 10 वाजता परशुराम साळवे महाराज यांच्या हस्ते घटस्थापना होईल. 11 वाजता राजुरा येथील गुरुदेव भजन मंडळ साईनगर व दुपारी 1 वाजता ओम साई महिला-पुरुष भजन मंडळ, गांधी चौक यांचे भजन असतील तर रात्रौ 7  वाजता नामदेवराव धुमाळे व संच, मोरांगणा तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथील गोंधळाचा कार्यक्रम राहील. दि. 27 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजता माथेकर महाराज, माथा तालुका कोरपना यांचे कीर्तन यांना साथ संगत असेल श्रीकृपा गुरुदेव भजन मंडळ, जवाहर नगर दुपारी 3 वाजता फुलाजी बाबा भजन मंडळ ,सायंकाळी 5 वाजता परमहंस आडकोजी महाराज सेवा भजन मंडळ, इंदिरा नगर रात्रौ 7 वाजता गुरुदेव सेवा भजन मंडळ, भेंडाळा व त्यानंतर लगेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला राजुरा शहरातील व अन्य भक्त, भाविक मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला माता सेवा समिती, माता मंदिर समिती, युवक-युवती समिती, जवाहर नगर यांनी केले आहे.

        राजुरा शहरात घरगुती कुठलेही धार्मिक विधी असल्यास आवर्जून या माता मंदिर देवस्थान येथे अनेक भक्त-भाविक धार्मिक विधी पार पाडतात, नवसाला पावणारी व भक्तांच्या सुख दुःखाला धावून जाणारी अशी ओळख असलेल्या या माता मंदिराची ख्याती आहे. पूर्वीच्या घनदाट जंगलात वसलेले हे माता मंदिर आता जवाहर नगर वार्डाची शोभा वाढवत आहे. दरवर्षी या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करीत अनेक समाजप्रबोधनात्म व जनजागृती करणारे कार्यक्रम घेतले जातात. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top