Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दीपोत्सव देशाची एकात्मता अखंडित ठेवणारा हा सण - हंसराज अहिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गौ पूजेसह विविध क्षेत्रातील गुणवंताचा दीपोत्सव स्नेहमिलनात सत्कार आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२३) -         मागासवर्...

गौ पूजेसह विविध क्षेत्रातील गुणवंताचा दीपोत्सव स्नेहमिलनात सत्कार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२३) -
        मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांच्या संकल्पनेतून दिपोत्सव स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन नक्षत्र हॉल येथे भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती हंसराज अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री, माजी आमदार अँड.संजय धोटे (Adv. Sanjay Dhote), खुशाल बोंडे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, सिद्धार्थ पथाडे, आरपीआय(आ) नेते, सुधीर घुरडे, जेबीसीसीआय सदस्य, भारतीय मजदूर संघ, डॉ.संभाजी वारकड, प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय, माजी नगराध्यक्ष विलास बोनगीरवार, भाजपा नेते, संजय पावडे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा, प्रा.डॉ.राजेश खेराणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, सतीश धोटे, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, सुनील उरकुडे, राजुरा तालुका अध्यक्ष भाजपा, वाघुजी गेडाम, आदिवासी नेते, सुनंदा डोंगे, तालुका अध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा, भाजपा महामंत्री अँड.इंजि. प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, तालुका अध्यक्ष भाजयुमो सचिन शेंडे, माजी सभापती नप राधेश्याम अडानिया, सौ.प्रीती रेकलवार, श्रीमती उज्वला जयपूरकर, प्रियदर्शनी उमरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गौ पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून दीपोत्सव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त गुणवंताचा सन्मानचिन्ह, शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला जयपूरकर यांनी केले. प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी तर आभार ऍड. इंजि. प्रशांत घरोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना स्नेहभोजन घेतले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशवितेकरिता भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी, भाजयुमो,कामगार आघाडी,आदिवासी आघाडी, भाजपा विविध आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.

        दिवाळी हा आपली संस्कृती जोपासणारा सण असून अंधाराकडून प्रकाशाकडे जात देशाची एकात्मता अखंडित ठेवण्याचा सुद्धा हा सण आहे. विविधतेत एकता सर्व सामावेशक असा हा पवित्र सण असून दीपोत्सवाच्या माध्यमातून स्नेहमीलन आणि एकमेकांना शुभेच्छा देण्याचा हा आनंदी क्षण आपण अविरतपणे सुरू ठेवल्याचे समाधानही व्यक्त केले. एखाद्या सण-समारंभ साजरा करीत सर्वांना एकत्रित आणून तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आपण निरंतर जोपासत असल्याचेही हंसराज अहिर म्हणाले. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top