Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा  भद्रावती (दि. 25 एप्...
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
भद्रावती (दि. 25 एप्रिल 2025) -
        भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथील एका महिलेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत ही धडक कारवाई दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. या कारवाईत एकूण 75,375 किमतीचा माल जप्त करण्यात आला असून, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

         पोलिसांनी मौजा चंदनखेडा येथील सौ. निर्मला शामराव शेळके यांच्या राहत्या घरातील स्टोअर रूममध्ये पंचनामा करून झडती घेतली असता, त्यांच्या घरी प्रतिबंधित तंबाखू मजा 108 सुगंधित तंबाखू 60,775 रुपये किमतीचा, होला होका तंबाखू 8,200 व ईगल होका तंबाखू 6,400 रुपये किमतीचा असा एकूण 75,375 रुपये किमतीचा माळ जप्त केला. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 189/2025, भारतीय दंड विधान कलम 223, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या कलम 30(2) 26(2) (ए) 3,4,59 (आय) सह नियम 2011 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय वरोरा पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन भद्रावतीच्या पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाडीवे यांच्या नेतृत्वात अनुप आसुनकर, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, योगेश घाटोळे यांनी केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top