Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इन्फंट चे फुटबॉलपटू गीता राजभर, ओमप्रकाश टोंगे राज्यस्तरावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२३) -         इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राज...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२३) -
        इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या फुटबॉल खेळाडूंची राज्यस्तरावर संपन्न होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा १७ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ह्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत इयला १० व्या वर्गातून गीता अनिरुद्ध राजभर व ओमप्रकाश राजु टोंगे या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. (Infant Jesus English High School Rajura)

        विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote), सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत घोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल एस क्षीरसागर, शुभम बन्नेवार यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (rajura) (aamcha vidarbha) (educational) (sports)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top