Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लक्कडकोट वासियांनी केला आदर्श कायम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामसभेत गावात दारूबंदीचा निर्णय आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२३) -         राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध धंद्यांना...

ग्रामसभेत गावात दारूबंदीचा निर्णय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२३) -
        राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध धंद्यांना ऊत आले असून जागोजागी बियर बार, बियर शॉपी, वाईन बार, अवैध दारू विक्री, अवैध कोळसा स्टाल असे धंधे सुरु असून त्यात वरुर व पोडसा येथील शासकीय परवानगीने सुरु असलेल्या मनोरंजन क्लब मुळे सर्वसामान्य नागरिक परेशान आहेत मात्र आता चंद्रपूर जिल्यातील राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय आदर्श ठरेल असे भाकीत व्यक्त करण्यात येत आहे. 

        ग्रामपंचायत लक्कडकोट येथे ग्राम सभा घेण्यात आली. ग्राम सभेत गावातील महिला व पुरुष मिळून 132 लोकांची उपस्थिती होती. या ग्रामसभेत क्लब आणि बियर बार सुरू करण्याकरीता ग्राम पंचायत कार्यलयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. या मागणीचा सर्वानी विरोध दर्शवित मागणी फेटाळून लावली. मागणीला विरोध दर्शविण्यात महिलांची संख्या अधिक होती हे येथे विशेष. यावेळी महिलांनी गावाला १००% नाशामुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला. निर्णयाला गावातील सर्वनागरिकांनी आपली समहती दर्शवली या ऐतिहासिक निर्णया मुळे लक्कडकोट गावातील नागरिकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. गावात लवकरच दारूमुक्त करण्याकरिता संबंधित विभागाशी पाठपुरावा करून सुरु असलेल्या बियर बार ला ग्राम पंचायत कडून बंदी चे नोटीस देण्याच्या सुचना गावकरांनी सचिवाला दिल्या आहे. ग्रामसभेच्या या निर्णयाला प्रशासनाची किती साथ मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (rajura) (lakkadkot) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top