Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शहराच्या विकासासाठी १८ कलमी मागण्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सर्व पक्षीय उमेदवारांना थेट निवेदन स्वच्छता, पर्यावरण, पाणी, आरोग्य यावर भर आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २४ नोव्हेंबर २०२५) -      ...
सर्व पक्षीय उमेदवारांना थेट निवेदन
स्वच्छता, पर्यावरण, पाणी, आरोग्य यावर भर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २४ नोव्हेंबर २०२५) -
        शहराचा विकास, स्वच्छता, पर्यावरण आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींच्या समाधानासाठी विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सर्वच पक्षीय उमेदवारांकडे अठरा कलमी मागणीनामा सादर करण्यात आला. गाव ते देश पातळीवर सक्रिय राहून विकासाच्या निर्णयांमध्ये लोकांचा आवाज पोहोचवणाऱ्या या संघटनांनी यावेळी शहरातील प्रमुख समस्यांवर लक्ष वेधत उमेदवारांकडून ठोस हमीची अपेक्षा व्यक्त केली.

        शहरातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राधेश्याम अडानिया, काँग्रेस, शेतकरी संघटना, आरपीआय समर्थित नगर विकास आघाडी उमेदवार अरुण धोटे , शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राजेंद्र डोहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) उमेदवार आदित्य भाके यांना सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष भेट देत मागणीनामा हस्तांतरित केला. या वेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले, सृजन नागरिक मंचचे मिलिंद गड्डमवार, गुरुदेव सेवा मंडळाचे मारोती सातपुते, जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्थेचे रतन पचारे, माजी विद्यार्थी संघाचे अविनाश दोरखंडे, छावा फाउंडेशनचे आशीष करमरकर, आझाद फाऊंडेशनचे आसिफ सय्यद तसेच मनोज तेलीवार, बबलू चव्हाण, आकाश वाटेकर, विलास कुंदोजवार, प्रणिता मांडवकर, मनोज कोल्हापुरे, रोहित बताशंकर आदींची उपस्थिती राहिली.

        अठरा कलमी मागणीनाम्यात शहरातील स्वच्छता व्यवस्थेची सुधारणा, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था, वर्षा जलसंचयन, शोषखड्डे, शहराचे सौंदर्यीकरण, पर्यावरणीय संरचना, निर्माल्य संकलन प्रकल्प, ऐतिहासिक वारसा वृक्षांचे संवर्धन, अवैध अतिक्रमणावर नियंत्रण, तक्रार निवारण प्रणाली मजबूत करणे, आरोग्य–शिक्षणविषयक सुधारणा, कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकता असे बहुआयामी मुद्दे समाविष्ट आहेत.

        मतदानाच्या पारदर्शक प्रक्रियेसाठी आणि शासनप्रणालीत लोकसहभाग वाढवण्यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी नागरिकांना शंभर टक्के मतदानाचे आवाहन केले. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावून शहराच्या भविष्यात ठोस भूमिका बजावावी, असे आवाहनही करण्यात आले.

#RajuraElection2025 #CitizenDemandCharter #UrbanDevelopment #CleanCityCampaign #RajuraVotes #CommunityVoice #PeopleFirstAgenda #ElectionUpdates #CivicRights #RajuraProgress #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top