Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'चंदू' च्या मदतीला पुढे आले 33-34 वर्षांपूर्वीचे विद्यार्थी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'चंदू' च्या मदतीला पुढे आले 33-34 वर्षांपूर्वीचे विद्यार्थी इन्फंट कान्व्हेंटच्या माजी विद्यार्थ्यांनी केली 'चंदू' ची आर्थिक...
'चंदू' च्या मदतीला पुढे आले 33-34 वर्षांपूर्वीचे विद्यार्थी
इन्फंट कान्व्हेंटच्या माजी विद्यार्थ्यांनी केली 'चंदू' ची आर्थिक मदत
'चंदू' ला 80 हजाराची मदत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शहरातील प्रख्यात इंग्रजी शाळा इन्फंट जिझस इंग्लिश स्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून चक्क 33-34 वर्षानंतर सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थांना एकत्र करून भेट समारंभ आयोजित करण्याची भन्नाट कल्पना आली. या कार्यक्रमात शाळेचे संस्थापक ई.एम. डेविड व त्यांची पत्नी मेरी सोबतच सर्व माजी शिक्षक, शिक्षिकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात सतत 7-8 वर्ष चपराशी या पदावर सेवा देणाऱ्या 'चंदु' या नावाने ओळख असलेल्या चंद्रशेखर बोरकर यांना ही विशेष रूपाने आमंत्रित करून त्यांचाही सत्कार करण्यात आला.
शाळेत चपराशी असलेल्या 'चंदु' ला स्टेज वर बोलाऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या कंबरेतील हाडाला गंभीर दुखापत असूनही आपल्या शाळेतील मुलांच्या विनंतीवर चंदु सर्वांची भेट घेण्याकरिता तो आला होता. आयोजक माजी विद्यार्थ्यांनी मंचावर त्याच्या हाताने शाळेची घंटी वाजवून शाळेच्या काळातील जुनी आठवणी जिवंत केली. चालायला पण अशक्त झालेल्या चंदू ला स्टेजवर घंटी वाजवत बघणाच्या हा क्षण चंदु सह सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनाला भरावून टाकणारा होता. चंदु साठी आधीच नवीन कुर्ता, पायजामा, टोपी आणि त्याच्या पत्नीला नवीन साडी देण्यात आली होती. शिवाय विद्यार्थ्यांतर्फे चंदुला तीन हजार रुपयाची अन्नाची किट उपहार स्वरूप देण्यात आली. शुभ्र पांढरे कपडे घालून चंदु छान दिसत होता. मावळत्या वयामुळे त्याची शारीरिक आणि आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे लक्षात आल्याने काही विद्यार्थ्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नाकरिता आर्थिक मदत देण्याचे ठरवले आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी चंदुला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यासाठी सरळ हाताने सर्वप्रथम मसूद अहमद यांनी 1100 रू. आणि दिलीप सदावर्ते यांनी 1100 रू. देण्याची घोषणा केली. बघता-बघता चंदु च्या मदतीला अनेक शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य करत एकूण 80 हजार रुपयाचा निधी क्षणार्धात जमवून टाकला. त्यातील 5 हजार रुपये त्याच्या घरी जाऊन नगदी देण्यात आले आणि उर्वरित 75 हजार रुपयांची त्याच्या नावाची एफडी बनण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आवाहना नंतर अनेक विद्यार्थ्यांसोबतच शाळेचे माजी मुख्याध्यापक मसूद अहमद, शिक्षक दिलीप सदावर्ते, सूरज, अशोक मेडपल्लिवार, डॉ. सत्यवान काटकर, शिक्षिका संध्या पाटील, सरोज लेखराजनी, ज्योत्स्ना चव्हाण, स्वाती देशपांडे, नंदा आमिडवार आदि शिक्षक व शिक्षिकांनी चंदुसाठी आर्थिक सहकार्य केले. सोबतच चंदुला आर्थिक सहयोग करण्यासाठी शाळेतील माजी विद्यार्थी बजाज बंधू, धनराजसिंह शेखावत, हरभजनसिंह भट्टी, प्रशांत गोठी, हितेश डाखरे, ओबय्या दासरी, लक्ष्मण गुप्ता, उपेंद्र गुप्ता, पि.सी. नवीन, प्रफुल जूनघरे, गुलिंदर कौर, सुधीर नथानी आदिनी विशेष सहकार्य केले. फक्त जुन्या आठवणीला उजाळा देण्याकरिता कार्यक्रमापुरतं मर्यादित न राहता आपण समाजाकरिता काही देणे लागतो या हेतूने मानव हित जोपासणाऱ्या माजी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या माणुसकीची सर्वत्र प्रसंशा होत आहे.
22 Jul 2022

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top