Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूरात उत्साहात पार पडला वाहन चालक दिन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा पुढाकार आमचा विदर्भ - दीपक शर्मा गडचांदूर (दि. १८ सप्टेंबर २०२५) -         अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या...
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा पुढाकार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. १८ सप्टेंबर २०२५) -
        अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने वाहन चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रुग्णांना फळवाटप तसेच ट्रान्सपोर्ट नगर अंबुजा फाटा येथे विविध ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुपरवायझर आणि वाहन चालक यांचा सत्कार करून कार्यक्रम पार पडला. ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनंता रामटेके, दुर्गापूर शाखा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांच्या हस्ते डॉ. गेडाम यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. दरम्यान शासकीय कामानिमित्त गडचांदूर येथे आलेले चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक संजय सर यांनी या औचित्याचा फायदा घेत संघटनेचे अध्यक्ष सुरज उपरे, जिल्हा अध्यक्ष अनंता रामटेके आणि सुरेश वाघमारे यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

        ट्रान्सपोर्ट नगर अंबुजा फाटा येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष सुरज उपरे, महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत विविध सुपरवायझर आणि वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वसंत माणूसमारे, पंकज बोंडे, महादेव वाघमारे, राजकुमार धुळे, हनुमान मस्कले, देविदास कांबळे, योगेश लालसरे, प्रफुल्ल गावंडे, अविनाश बोरूले, यासीर शेख, सिद्धार्थ नरवाडे, राकेश आदे, योगेश आत्राम, सिद्धार्थ वाघमारे आदींचा समावेश होता. या प्रसंगी शेकडो वाहन चालक बांधव उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

#DriversDay #TransportWorkers #AneshaUnion #DriverRespect #GadchandurEvents #TransportSupervisors #SurajbhauUpare #AnantRamteke #SureshWaghmare #RoadSafety #TransportCommunity #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top