- विज वितरण कंपनीच्या अधिका-यांबरोबरच्या बैठकीत दिले निर्देश
चंद्रपूर -
गेल्या काही दिवसांपासुन संपुर्ण चंद्रपूर जिल्हयात ग्राम पंचायतचे पथ दिव्यांचे कनेक्शन थकबाकी असल्याने वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. जो संपूर्णपणे अन्यायकारक आहे. चंद्रपूर जिल्हा हा जंगलाचा जिल्हा असल्याने येथे वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे. अशा वेळेला ग्राम पंचायतची विज कापणे हे पुर्णपणे चुकीचे आहे. तोडगा निघेपर्यंत कुठल्याही गावाची विज कापु नये असे निर्देश लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा बल्लाारपूर विधानसभा क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विज वितरण कंपनीच्या अधिका-यांबरोबरच्या झालेल्या बैठकीत दिले.
या बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता देशपांडे, अधिक्षक अभियंता चिवंडे मॅडम, कार्यकारी अभियंता फरासखानवाले, उपकार्यकारी अभियंता तेलंग, चौरसीया उपस्थित होते. अनेक ग्राम पंचायतींच्या तक्रारींवर तोडगा काढण्यापसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. मुनगंटीवार यांनी ग्राम पंचायतच्या पथ दिव्यांचे बिल जुन्या पध्दतीने जिल्हा परिषदनेच भरावे अशी मागणी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. त्याचप्रमाणे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना कनेक्शन न कापण्याबद्दल चर्चा केली. या दोन्हीे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या्बरोबर सुध्दा आ. मुनगंटीवार यांनी चर्चा केली.
बैठकीत ठरल्यााप्रमाणे कुठल्या्ही ग्राम पंचायतचे पथ दिव्यांंचे कनेक्शन कापणार नाही, पुढील तीन दिवसात कापलेले सर्व कनेक्शचन पुर्ववत जोडण्याच यावे हे विज वितरण कंपनीच्याा अधिका-यांनी मान्य केले. आ. मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना या संदर्भात जिल्हाधिका-यांशी संपर्क करुन पुढील सात दिवसात बैठक लावण्याचे निर्देश दिले. अशा प्रकारचे धोरण महाराष्ट्रातील अन्य जिल्हायात राबविले जात आहे का? याची चौकशी करण्याची निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी विज वितरण कंपनीच्या अधिका-यांना दिले व त्याची माहीती मला द्यावी असेही निर्देश दिले.
Advertisement
Related Posts
- दिवाली स्नेह मिलण री रंगत, राजस्थानी समाज एक दूजे सूं जुड़ा07 Nov 20250
राजस्थानी समाज री शान, वरिष्ठ महानुभावां रो सत्कारगीत, सत्कार और संस्कार सूं सतरंगी बन्यो मिलण-समारो...Read more »
- राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी प्रशिक्षणाची सुरुवात03 Nov 20250
16 नोव्हेंबर पासून एस.आर.टी. शेती प्रशिक्षणाची सुरुवातकमी मजुरांत शेती, जास्त उत्पादनआमचा विदर्भ - क...Read more »
- पूर्वविदर्भातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार ''चंद्रपूर कॅन्सर सेंटर''03 Nov 20250
२२ डिसेंबरला लोकार्पण, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभे राहिले २८० कोटींचे आधुनिक रुग्णालयसरसंघचालक मो...Read more »
- हॉटेल ताडोबा अतिथी इनवर पोलिसांची धाड; कुंटणखान्यावर कारवाई01 Nov 20250
पोलिसांच्या तत्परतेने पीडित महिलेची सुटकाआमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (01 नोव्हेंबर 2025) ...Read more »
- चंद्रपूरचे डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांना “भारत श्री रत्न सन्मान 2025” पुरस्कार01 Nov 20250
भारत श्री रत्न पुरस्काराने चंद्रपूरचा लौकिक वाढविलाआमचा विदर्भ - दीपक शर्मा नवी दिल्ली (01 नोव्...Read more »
- गौरवग्रंथ प्रकाशनाने सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना मिळणार नवा आयाम31 Oct 20250
मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून पुन्हा उजळणार खोबरागडे यांच्या कार्याचा सुवर्ण इतिहासआमचा विदर्भ - अन...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.