16 नोव्हेंबर पासून एस.आर.टी. शेती प्रशिक्षणाची सुरुवात
आमचा विदर्भ - कृष्णा वाघुजी गेडाम
चंद्रपूर (03 नोव्हेंबर 2025) -
कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारी एस.आर.टी. (Soil Regeneration Technique) पद्धत आता राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय, कमी खर्चिक आणि उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान शिकविण्यासाठी एस.आर.टी. शेती शाळा सुरू होत आहे. या शेती शाळेचे उद्घाटन दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी WhatsApp क्रमांक 9763166223 वर करून घ्यावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
एस.आर.टी. शेती म्हणजे काय?
एस.आर.टी. शेती ही नैसर्गिक तत्त्वांवर आधारित, मजूर व खर्च दोन्ही कमी करणारी आणि जमिनीची सुपीकता वाढविणारी शेती पद्धत आहे. या पद्धतीत रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जमिनीत सूक्ष्मजीव, गांडूळ, सेंद्रिय कर्ब आणि पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या साठवले जाते.
एस.आर.टी. शेती शाळेतील महत्त्वाचे विषय
- एका फवारणीत तणाचे संपूर्ण निर्मूलन – तीन महिन्यांपर्यंत तण न उगवणे
- तणनाशकाच्या योग्य फवारणीवरील मार्गदर्शन
- कमी मजुरांत शेती कशी करावी याचे तंत्रज्ञान
- बैल जोडी किंवा ट्रॅक्टरशिवाय शेती करण्याचे प्रयोग
- विकत न घेता जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय
- गांडूळ न विकत घेता शेतात तयार करण्याचे मार्गदर्शन
- डोळ्याला न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांचे संगोपन तंत्र
- एक रुपया न खर्चता पावसाचे पाणी जमिनीत साठविण्याची पद्धत
- डीएपी, युरिया यांसारख्या खतांचा अतिवापर कमी करण्याचे मार्ग
- एका वर्षात किमान तीन पिके घेण्याची संधी
- एकरी 15,000 ते 20,000 रुपयांची बचत करण्याची शक्यता
- भाताचे उत्पादन बिना चिखलणी घेण्याचे तंत्र
- डबल कापसाचे उत्पादन व कमी जागेत जास्त उत्पादन
- प्रत्येक शेतीकामात वेळेची बचत
- रेसिड्यू-फ्री अन्नधान्याचे उत्पादन घेण्याचे मार्ग
- वाढत्या तापमानामुळे जमिनीची धूप थांबवून कायम गारवा निर्माण करणे
- 43 डिग्री तापमानातसुद्धा गांडूळनिर्मिती कायम ठेवण्याचे तंत्र
- शेतकरी आनंदी आणि तणावमुक्त कसे राहतील याबाबत मार्गदर्शन
निरंतर मार्गदर्शन आणि सहाय्य
एस.आर.टी. टीमकडून प्रशिक्षणानंतरही शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना प्रयोगशील, आत्मनिर्भर आणि टिकाऊ शेतीकडे वाटचाल करण्यास हे प्रशिक्षण मोलाचे ठरणार आहे. राजुरा व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या शेती शाळेचा लाभ घ्यावा, स्वतःसाठी तसेच जमिनीच्या आरोग्यासाठी ही पद्धत आत्मसात करावी, असे आयोजकांनी सांगितले आहे.
#SRTFarming #RajuraFarmSchool #OrganicFarming #SmartFarming #SoilRegeneration #FarmersEmpowerment #SustainableAgriculture #NaturalFarming #ZeroChemicalFarming #HappyFarmer

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.