आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. 09 नोव्हेंबर 2025) –
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसर शनिवार रात्री अक्षरशः थराराने दणाणून गेला. रहदारीने नेहमीच गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास तब्बल 10 फूट लांबीचा आणि अंदाजे 25 किलो वजनाचा अजगर साप पाहायला मिळाला. अचानक एवढ्या मोठ्या अजगराचे दर्शन झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती विरुर स्टेशन परिसरातील सर्पमित्रांना देण्यात आली. तत्काळ सर्पमित्र रवी खोबरे, सर्पमित्र रविकांत ताकसांडे आणि सर्पमित्र गौरव जीवतोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनी मोठ्या संयमाने आणि कौशल्याने अजगराला सुरक्षितरित्या पकडले. कोणतीही इजा न पोहोचवता अजगराला सुरक्षित सुब्बई जंगलात सोडण्यात आले. यामुळे सापाचा जीवही वाचला आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीतीही दूर झाली. या धाडसी, संवेदनशील आणि तात्काळ प्रतिसादामुळे सर्पमित्र रवी खोबरे, सर्पमित्र रविकांत ताकसांडे आणि सर्पमित्र गौरव जीवतोडे यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत या तिघांनी उभा केलेला आदर्श स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अशा प्रसंगी सर्पमित्र तात्काळ धाव घेतात, त्यामुळे लोकांची सुरक्षा राखली जाते आणि प्राणिमात्रांचाही जीव वाचतो. मात्र अद्यापही सर्पमित्रांना शासनाकडून कोणताही आर्थिक आधार किंवा सुरक्षा-साहित्य मिळालेला नाही. कोणत्याही संरक्षणाशिवाय जीव धोक्यात घालून हे कार्यकर्ते सेवा देत आहेत. त्यामुळे विरुर स्टेशन परिसरातील नागरिकांनी शासनाकडे या सर्पमित्रांना योग्य मान्यता आणि सहाय्य मिळावे, अशी मागणी केली आहे.
#PythonRescue #WildlifeProtection #SnakeFriends #RajuraNews #AnimalRescue #VirurStation #ForestRelease #HumanityForAnimals #WildlifeHeroes #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.