शिवसेना (शिंदे) गटात प्रतिष्ठित व्यापारी धनंजय छाजेड़
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. 09 नोव्हेंबर 2025) –
येत्या नगर परिषद 2025 निवडणुकीसाठी गडचांदूर शहरात मोठा राजकीय स्फोट झाला आहे. गडचांदूरचे प्रतिष्ठित व्यवसायिक आणि समाजसेवी धनंजय छाजेड़ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. धनंजय छाजेड़ यांनी शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित झाल्यानंतर प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये घबराट पसरली आहे. शहरात चर्चा अशी की निवडणुकीपूर्वीच सर्व पक्षांचे गणित ढवळून निघाले आहे.
धनंजय छाजेड़ यांच्या एन्ट्रीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीतीत बदल सुरू केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अजून उमेदवारी जाहीरही नाही आणि गडचांदूरमध्ये शिवसेनेची जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गट आपली ताकद दाखवत असताना इतर पक्ष कार्यकर्त्यांची झोप उडाल्याचे चित्र आहे.
गौ संरक्षण ते सिकलसेल मोहीम
धनंजय छाजेड़ यांनी गडचांदूर आणि परिसरात समाजकार्याच्या माध्यमातून मोठी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गौ-रक्षणाचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. मानव सेवा समितीच्या माध्यमातून गरजूंसाठी मदत, आय कॅम्प, सिकलसेल तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. महिलांसाठी आरोग्यवर्धक शिबिरांचे आयोजन करून त्यांनी महिला वर्गाशी दृढ संपर्क निर्माण केला आहे.
पाच वर्षांनंतर राजकारणात पुनरागमन
राजुरा विधानसभा क्षेत्रात छाजेड़ यांची ओळख स्वच्छ प्रतिमेचे, शांत, प्रामाणिक आणि काम करणारे समाजसेवी व्यक्तिमत्व अशी आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी पुन्हा राजकारणात पाऊल टाकले आहे. फक्त धनंजय छाजेड़च नव्हे तर इतरही नेते-कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात सामील झाले आहेत. सचिन गुरनुले, सुधाकर ताजने, शांताराम कुरसंगे, अनिल सिडाम यांसह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश जाहीर केला आहे. यामुळे गडचांदूर शहरातील राजकीय गणित ढवळून निघाले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धनंजय छाजेड़ यांनी नगर परिषद निवडणुकीत सर्व प्रभागांतून उमेदवार उभे करण्याचे तसेच नगराध्यक्ष पदाची लढत देण्याचे संकेत दिले. या घोषणेनंतर राजकीय वातावरणात अधिकच खळबळ उडाली. या वेळी कोरपना तहसील प्रमुख राकेश राठौड, गडचांदूर शहर प्रमुख विक्की राठौड, युवा सेना तहसील प्रमुख अरविंद गोरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युतीत असली तरी शिवसेनेला दुय्यम वागणूक?
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युती असूनही, सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटाला दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच गडचांदूरच्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने स्वतःचा उमेदवार जाहीर केल्याने वातावरण जोरदार पेटले आहे. आता भाजप-राष्ट्रवादी गटाने काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#GadchandurElection2025 #ShivSenaShinde #DhananjayChhajed #banduhajare #PoliticalStorm #MunicipalPolls #SocialWorkerToLeader #ShindeGroupPower #ElectionBattle #GadchandurPolitics #TeamShinde #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.