आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (01 नोव्हेंबर 2025) -
दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे कुंटणखाना चालविणाऱ्या व्यक्तीवर धाड टाकण्यात आली.
मुखबिरीनुसार, लकी नावाचा एक युवक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये महिलांना आणून वेश्याव्यवसाय चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर त्वरित पथकाने हॉटेलवर छापा टाकला असता, आरोपी लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा वय 26 वर्ष, मॅनेजर, रा. अलवर, राजस्थान हा एका पीडित महिलेला अनैतिक धंद्यास प्रवृत्त करून स्वतःचा आर्थिक फायदा मिळवत असल्याचे उघड झाले. या प्रकरणात पोलीस स्टेशन रामनगर येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 7 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित महिलेला पोलीसांच्या उपस्थितीत सुरक्षिततेसह सोडविण्यात आले आहे.
सदरची कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक, मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, स.फो. धनराज कारकाडे, पो.हवा. सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, पोअ. प्रफुल गारघाटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम, महिला पोलीस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर/AHTU पथक आणि समाजसेविका सरिता मालू, रेखा भारसकडे (NGO चंद्रपूर) येण्या पथकाने केली. पोलीसांनी आवाहन केले आहे की, कोणत्याही लॉजिंग किंवा हॉटेल व्यावसायिकांनी अशा अवैध कुंटणखाणी चालविण्यास मदत करू नये. अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
#ChandrapurPolice #AntiHumanTrafficking #PoliceAction #CrimeBranch #RescueOperation #StopHumanTrafficking #LawAndOrder #ChandrapurNews #SocialJustice #WomenSafety #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.