आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 02 नोव्हेंबर 2025) -
रामपूर गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच सौ. निकिता रमेश झाडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने गावाच्या सर्व क्षेत्रांत विकासाचे काम गतीमान केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या कामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. सध्याच्या कार्यकाळात सरपंच सौ. निकिता रमेश झाडे यांच्या योजनाबद्ध नेतृत्वाखाली ग्रामविकासाची दिशा आणि दशा दोन्ही बदलताना दिसत आहेत. महिला नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाचे आदर्श उदाहरण घालून देणाऱ्या सौ. निकिता रमेश झाडे यांनी आजपर्यंत अनेक कामे पूर्णत्वास नेली असून, गावकऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा दोन्ही त्यांच्यापाठी आहे.
सौ. निकिता झाडे यांनी सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ठोस दृष्टीकोन ठेवला आहे. महिला नेतृत्व असूनही त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण आणि विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्या कामाची पद्धत, लोकसंपर्क आणि पारदर्शक कारभारामुळे रामपूर ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलतो आहे.
या कार्यक्रमात उपसरपंच राहुल बानकर, सदस्य अतुल खनके, वैशाली लांडे, रेखा आत्राम, सुनील नळे, लटारी रोगे, संतोषी दुधे, गवरी चोखरे, मजुषा लांडे, माया करलुके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. समारंभास पंचायत समिती अध्यक्ष ओम काळे, माजी सरपंच उज्वल शेंडे, माजी सरपंच रमेश कुडे, माजी सदस्य विलास कोडीरपाल, शेषराव बोन्डे, शिवसेना तालुका प्रमुख रमेश झाडे, मनोज उरकुडे, उत्तम गिरी, सुरेश लांडे, सिंधू बाई लांडे, अशोक रोगे, प्रभाकर लडके, मधुकर पोनलवार, सुरज गवाने, बंटी मालेकर, नितीन साळवे, विक्रम कोडीरपाल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांची माहिती :-
- मधुकर पोनलवार ते तातोबा हिंगाने (वॉर्ड क्र. 1) यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोड
- शिवमंदिर ते विढोबा मालेकर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम (वॉर्ड क्र. 1)
- दिनकर कावडे ते अशोक घोरखाटे ते दिवसें यांच्या घरापर्यंत खडीकरण रोड (वॉर्ड क्र. 2)
- विनोद आस्वले ते राजू वैरागडे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम (वॉर्ड क्र. 2)
- दादाजी मालेकर ते ब्रिलियंट कॉन्व्हेंट पर्यंत खडीकरण रोड (वॉर्ड क्र. 3)
- सुनील मडावी ते नत्थू वाघमारे यांच्या घरापर्यंत खडीकरण रोड (वॉर्ड क्र. 3)
- मंगेश काकडे ते उईके ते सास्ती रोड पर्यंत नाली बांधकाम (वॉर्ड क्र. 3)
- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ते शुभांगी कुरवटकर ते अविनाश बोबडे रोडचे खाडिकरण (वॉर्ड क्र. 4)
- सास्ती रोड ते चंद्रकांत भोयर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम (वॉर्ड क्र. 4)
या सर्व कामांमुळे रामपूर गावात मूलभूत सुविधा बळकट होऊन, रस्ते आणि नालींच्या विकासामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कामांच्या शुभारंभावेळी गावकऱ्यांनी सरपंच सौ. निकिता झाडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. गावात आता चर्चेचा विषय एकच आहे, “रामपूरचा चेहरा बदललाय, कारण नेतृत्व महिलांचं आणि दृष्टिकोन विकासाचा!” गावातील तरुण, महिला आणि वयोवृद्ध नागरिक सौ. झाडे यांच्या कामगिरीवर समाधानी असून, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना जिल्हा परिषदेवर पाठविण्याची संधी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#RampurDevelopment #VillageProgress #WomenLeadership #GramPanchayatWorks #RuralTransformation #sarpanch #nikitarameshzade #rameshzade #shivsena(ubt) #InfrastructureGrowth #TeamRampur #GrassrootDevelopment #VillagePride #SmartVillage #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.