आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) –
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या संदर्भात २९ ऑक्टोबर रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन गौरवग्रंथ प्रकाशनाबाबत मागणी सादर केली. या भेटीत आ. मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या सामाजिक, राजकीय आणि संविधानिक कार्याचे मोल अधोरेखित केले. या मागणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या न्याय, समता, सामाजिक परिवर्तन आणि संविधानिक मूल्यांवरील निष्ठेला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची मागणी खोबरागडे परिवार आणि जन्मशताब्दी महोत्सव समितीने केली होती. त्यांच्या या मागणीस आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाठिंबा देत विधानसभेच्या माध्यमातून अधिकृत मान्यता मिळविण्याचा पुढाकार घेतला.
या गौरवग्रंथात बॅरिस्टर खोबरागडे यांच्या संसदीय कार्याची झलक, सामाजिक योगदान, वैचारिक भूमिकेचा विस्तार, भाषणांची वैशिष्ट्ये आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समाविष्ट केले जाणार आहेत. “हा गौरवग्रंथ समाजासाठी दीपस्तंभ ठरेल आणि नव्या पिढीला न्याय, समता व सामाजिक जबाबदारीचे भान देईल,” असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही आमदार मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या कार्याचा गौरव राखण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बॅरिस्टर खोबरागडे यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्या तिकिटाचे प्रकाशन आ. मुनगंटीवार यांच्या हस्तेच पार पडले होते, ही बाब उल्लेखनीय आहे. सामाजिक जाणिव, इतिहासाचे भान आणि महान व्यक्तिमत्वांचा सन्मान राखण्याची वृत्ती त्यांनी पुन्हा एकदा या उपक्रमातून दाखवून दिली आहे.
बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारा हा ग्रंथ त्यांच्या विचारांना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवेल आणि नव्या पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
#SudhirMungantiwar #RajabhauKhobragade #AmbedkariteLegacy #SocialJustice #EqualityAndDemocracy #MaharashtraPolitics #InspirationForYouth #BaristerKhobragade #SudhirMungantiwarInitiative #TributeToLeaders #RahulNarvekar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.