आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) –
देशाच्या अखंडतेसाठी, राष्ट्रीय एकतेसाठी आणि लोकशाहीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतरत्न माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, स्व. इंदिरा गांधी यांचे बलिदान आणि सरदार पटेल यांची राष्ट्रीय एकतेसाठीची भूमिका ही भारतीय राजकारणातील सुवर्ण पान आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकशाहीच्या सुदृढतेसाठी कार्य करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात स्व. इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सर्व पदाधिकाऱ्यांनी विनम्र अभिवादन केले. त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, दूरदर्शी आणि प्रेरणादायी कार्याचा स्मरण करत देशसेवेची नवी प्रेरणा घेण्याचा संकल्प करण्यात आला. या प्रसंगी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शहराध्यक्ष माजी नगरसेवक हरजीतसिंग संधू, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, अॅड. सदानंद लांडे, साईनाथ बतकमवार, जिल्हा महासचिव एजाज अहमद, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, विमुक्त जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष इंदूरवार, सुदर्शन दाचेवार, भाष्कर येसेकर, संदेश करमनकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, सुधाकर उईके, कुरूमदास पावडे, बोंडे गुरुजी, लटारू नारनवरे, बंडू उपरे, बाबुराव कटाले, धनराज चिंचोलकर, इंदूबाई निकोडे, पुणम गिरसावळे, सुमित्राबाई कुचनकर, सय्यद साबिर, भुषण बानकर, रतन पचारे, मधुकर झाडे, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, निरंजन मंडल, गोलू ठाकरे, सुरज माथनकर, अनंता ताजने, रविंद्र आत्राम, बाळू झाडे, प्रवीण ताकसांडे, रंगनाथ ताकसांडे, देवराव जिवतोडे, समिर देठे, राकेश उपरे, किशोर भोंगळे, रमेश चांदेकर, सुधाकर तोक्कलवार, नागराज कोरम, आकाश इग्रपवार, अश्विन बावनकर यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#IndiraGandhi #SardarVallabhbhaiPatel #NationalUnityDay #RajuraCongress #SubhashDhote #UnityForNation #TributeToLeaders #IronLadyOfIndia #LohPurush #SpiritOfDemocracy #arundhote kundataijenekar sunildeshpande #harjitsinghsandhu #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.